पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला .

 कुसुमाग्रज नगरी एम .ई .टी . महाविद्यालय , आडगांव नाशिक 

शामलाक्षरी - कविता संग्रह *भावदर्पण -कथासंग्रह






साहित्यनगरी नाशिक येथे ९४ व्याअखिल भारतीय  साहित्य संमेलनात दिनांक ५ डिसेंबर २०२१ ,सकाळी  ११  वाजता "शामलाक्षरी व भावदर्पण" सौ .शामला पंडित ( दीक्षित ) यांच्या  पुस्तकाचे  प्रकाशन संपन्न झाले.


शामलाक्षरी कविता म्हणजे  एका शब्दाचे दोन अर्थ घेऊन केलेली  कविता होय . शामलाक्षरीसाठी सौ . शारदा पानगे , सौ . शोभाताई जोशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत . कवयित्री मृणालिनी कानिटकर- जोशी यांनी प्रास्तावना दिली आहे . वर्ग अध्यापनासाठी हा नव काव्यप्रकार उपयुक्त आहे .भाषिक खेळ म्हणून या साहित्य प्रकाराची ओळख करुन दिल्यास शब्दसंग्रह वाढेल व मराठी भाषेची आवड निर्माण होईल.

तसेच भावदर्पण कथासंग्रहास डॉ .प्रतिमा इंगोले यांनी प्रस्तावना दिली आहे . विविध भावभावनांचे वर्णन ग्रामीणशैली या कथांमधून दिसून येते. सौ . शामला पंडित यांचा हा पहिला कथासंग्रह व शामलाक्षरी हा१४वा कविता संग्रह आहे . प्रणाली पंडित ,प्रणाली प्रकाशन , चिंचवड यांनी पुस्तक निर्मिती उत्कृष्ट केली आहे . मुखपृष्ठ उत्कृष्ट साधले आहे .

पुस्तक प्रकाशन मा .डॉ .ई . वायुनंदन कुलगुरु, यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक . मा .श्री . प्रेमनाथ सोनवणे , मा .सौ . शेफाली समिर भुजबळ मॅडम ,मा .श्री . अजय बिरारी सर( गझलकार , सिने अभिनेता ) संचालक श्री . सुभाष सबनिस , मा .श्री .पानगे साहेब ( मा . शिक्षणाधिकारी मूल्यमापन SCERT पुणे)मा .सौ .पानगे मॅडम, मा. संदीप  तापकीर सर , मा . भिसे सर या मान्यवरांच्या हस्ते झाले . आजतागायत १५ पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल सौ . शामला पंडित ( दीक्षित ) यांचे कौतुक केले . साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन साठी उत्कृष्ट आयोजन व नियोजन केले होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या