चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला लुटले...ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान घटना..

 चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला लुटले...ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान घटना..



 डोंबिवली ( शंकर जाधव ) प्रवाश्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट खेचून चोरट्याने ट्रेन धीमी होताच पळ काढला.हि घटना ३० नोव्हेबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये घडली.याप्रकरणी प्रवाशाने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.


   मिळालेल्या माहितीनुसार, एरोली येथील रहिवासी राहुल मळसिद्ध बनसोडे  ( ५९ ) हे कामानिमित्त  सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडी नंबर ०२११५ या गाडीला कोच नंबर s/०८ , सीट नंबर ०७ वर बसून प्रवास करत होते.या डब्यात एक अज्ञात इसम बनसोडे यांच्याजवळ आला.`मला कल्याण रेल्वे स्थानकात उतरायचे आहे, मला थोडा वेळ सीट बसू द्या`अशी विनंती केली.काही वेळाने अज्ञात चोरटा त्याच्या जवळील सीटवर बसला.ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान एक्स्प्रेस धीमी झाल्याचे पाहताच चोरट्याने बनसोडे यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट खेचून गाडीतून उडी मारून पळ काढला.काही वेळाने एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आल्यावर बनसोडे यांनी तिकीट तपासनीस घडलेला सर्व प्रकार सांगितला.या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२ न्वये गुन्हा दाखल झाल आहे. या प्रकरणी  सहायक  पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या