कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले १०९ प्रवाश्यांच्या शोधत ....केडीएमसी क्षेत्रात ७२ टक्के पहिला व ५२% हा दुसरा डोस पूर्ण

 कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले १०९  प्रवाश्यांच्या शोधत ....केडीएमसी क्षेत्रात ७२ टक्के पहिला व ५२% हा दुसरा डोस पूर्ण



डोंबिवली ( शंकर जाधव )दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक  ३३ वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच बरोबर  नायजेरियातून दोन वर्षांनी डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने महानगरपालिका सतर्क झाली असून महानगरपालिकेने त्यांच्या संपर्कात असलेले नातेवाईक व इमारतीत राहणाऱ्या लोकांची आरटीपीसीआर  तपासणी सुरू केली आहे. महानगरपालिका आयुकतांनी आज घेतलेल्या  पत्रकार परिषदेत बोलताना पालिका शासनाकडून विविध देशातून   कल्याण डोंबिवली मध्ये आलेल्या २९५  नागरिकांची यादी मिळाली असल्याचे सांगत त्यापैकी  ८८नागरिकांची ऑंटी जैन टेस्टिंग करण्यात आली असून ३४ लोकांचा अहवाल नेगेटिव्ह आले असून ४८ प्रवाशांचे अहवाल येणे बाकी  असल्याचे सागत या यादीतील १०९ पैकी काही प्रवाशांचे  फोन स्विच ऑफ असल्याने व काही प्रवश्याच्या घराला  कुलूप असल्याने पालिका वैद्यकीय कर्मचारी  फील्ड मशनरी च्या माध्यमातून शोध सुरू असल्याची माहिती महानगरपालिका  आयुक्त यांनी दिली.  

त्याचबरोबर परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली  तयार ,परदेशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस होम कोरोटाईन बंधनकारक , ७ दिवसानंतर कोरोना चाचणी..चाचणी नंतर  ७दिवस कोरोटाईन बंधनकारक यासारखे नियमाच्या आदेश काढले असून उद्यापासून कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये मास्क न लावणार्यावर पोलिसांबरोबर संयुक्त कारवाई करण्याचे आदेश यावेळेस महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या