उघड्यावर टाकलेल्या मळी मुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांचे फर्टिलायझर्स कंपनीला निवेदन...

 उघड्यावर टाकलेल्या मळी मुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांचे फर्टिलायझर्स कंपनीला निवेदन...


संगमनेर- बिरेवाडी फाट्यानजीक श्री. व्यंकटेशा फर्टिलायझर्स लि. कंपनीसाठी लागणारी मळी उघड्यावर टाकण्यात आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच सदर मळीमुळे परिसरातील पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे स्रोत विहीर, कुपनलिका,जवळच असणारा नाला प्रदूषित होऊन परिसरातील सर्वच पिण्यायोग्य असणारे पाण्याचे स्रोत प्रदुषीत होत आहे तरी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात.

चारही बाजूने भिंत बांधून,वरून पूर्णपणे शेड बांधणे. मळी टाकण्याच्या ठिकाणी खाली पीसीजी करणे. मळीवर पडणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करणे, सदर पाणी इतरत्र नळीला किंवा ओढ्याला सोडू नये. उघड्यावर टाकलेली मळी पूर्णत: उचलून कंपाऊंडच्या आत घेणे. टाकलेल्या मळीचा वास बाहेर येऊ न देणे. सदरची मळी पूर्णपणे बंदिस्त रित्या साठविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

 वरील प्रमाणे उपायोजना केल्या तरच परिसरातील नागरिक, बालकांचे व पशुधनाचे आरोग्य अबाधित राहील. तरी सदर अर्जाची दखल पुढील पंधरा दिवसात घेण्यात येऊन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी नवनाथ ढेंबरे, पंढरीनाथ ढेंबरे, नानासाहेब ढेंबरे , शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे, श्री.व्यंकटेशा फर्टिलायझर्सचे सर्वेसर्वा श्री.बाबासाहेब भोसले तसेच बिरेवाडी (फडवस्ती) येथील ग्रामस्थ  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या