जवळजवळ साडे तीन लाख धारपवार बांधवांना या प्रतिष्ठानच्या मार्फत एका प्रवाहात आणणार

 जवळजवळ साडे तीन लाख धारपवार बांधवांना या प्रतिष्ठानच्या मार्फत एका प्रवाहात आणणार

   ऍड.राजन पवार




                                            

डोंबिवली ( शंकर जाधव ) धारपवारांच्या गौरवशाली इतिहासाची प्रत्येकाला माहिती मिळावी,समाज एक व्हावा,प्रत्येक धारपवार बंधुला विविध क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी श्रीमंत राजेपवार प्रतिष्ठान ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यास बांधवांचे सहकार्य लाभावे..महाराष्ट्रभर पसरलेल्या जवळजवळ साडे तीन लाख धारपवार बांधवांना या प्रतिष्ठानच्या मार्फत एका प्रवाहात आणण्याचे काम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार यांच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती ऍड.राजन पवार यांनी डोंबिवलीत दिली. डोंबिवली पश्चिमेकडील मराठा मंदीर सभागृहात पार पडलेल्या श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी जिल्हा आणि कल्याण डोंबिवली विभागाच्या वतीने दिनदर्शिका २०२२ प्रकाशन सोहळा आणि विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.


   कोकण विभाग संघटक ऍड. राजनदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि  चंद्रकांत पवार आणि  दत्तात्रय पवार यांच्या देखरीखीखाली हा सोहळापार पडला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे कोकण विभाग संघटक ऍड. राजनदादा पवार, कोरोना काळात महाराष्ट्रात पहिल्या कम्युनिटी क्लिनिकची स्थापना करणारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित मानखुर्द डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रसाद पवार,रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य म्हणून मान मिळविलेल्या मिरजोळी ग्रामपंचायतीतील रुचिता रवींद्र पवार, व्हॉइस आर्टिस्ट आणि हिरकणी इव्हेंट्सच्या स्नेहलताई पवार, तळकोकण संघटक  सचिन पवार, रत्नागिरी जिल्हा संघटक  संतोष पवार, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख  विकास पवार, खांबाळे, सिंधुदुर्ग गावचे सुनील पवार आणि  प्रशांत पवार  आदी मान्यवर उपस्थित होते. 

       धारपवारांच्या गौरवशाली इतिहासाची प्रत्येकाला माहिती मिळावी,समाज एक व्हावा,प्रत्येक धारपवार बंधुला विविध क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी श्रीमंत राजेपवार प्रतिष्ठान ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यास बांधवांचे सहकार्य लाभावे, असे आवाहन यावेळी बांधवांना करण्यात आले.महाराष्ट्रभर पसरलेल्या जवळजवळ साडे तीन लाख धारपवार बांधवांना या प्रतिष्ठानच्या मार्फत एका प्रवाहात आणण्याचे काम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार यांच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती ऍड.राजन पवार यांनी यावेळी दिली. आता आणखी कोकणातील सर्व धार पवार बांधवांना या प्रवाहात जोडणार असल्याचे ऍड.पवार यांनी सांगितले.


       यावेळी  तुषार विश्वासराव यांनी गेल्या वर्षभरातील प्रतिष्ठानने केलेल्या कार्याची माहिती दिली.संतोष पवार यांनी पवार कुळाची,देवकाची आणि धार पवार घराण्याची माहिती दिली.कार्यक्रमाला उपस्थित धार पवार भगिनींनी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.यावेळी विघ्नेश आणि विहान या छोट्या धार पवार बांधवानी महाराजांवरचा पोवाडा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.राजन पवार यांच्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक बांधव  सुरज पवार संदेश पवार,  सुशांत विश्वासराव, सुयोग विश्वासराव, अमित पवार यांनी योगदान दिले.सोहळ्याला उपस्थित सर्व बांधवांना दिनदर्शिका आणि प्रतिष्ठानच्या स्टिकरचे वाटप करण्यात आले.या सोहळ्याला कल्याण,डोंबिवली,ठाणे,पालघर, नाशिक, मुंबई परिसरातील धारपवार बांधव उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या