लोकलच्या दरवाज्याला लटकून स्टंट करणाऱ्या तरुणाला प्रवाश्यांनी पकडले

 लोकलच्या दरवाज्याला लटकून स्टंट करणाऱ्या  तरुणाला प्रवाश्यांनी पकडले



डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना

  डोंबिवली ( शंकर जाधव ) लोकलच्या दरवाज्याला लटकून स्टंट करणाऱ्या  एका तरुणाला त्याच डब्यातील प्रवाश्यांनी पकडून  रेल्वे स्थानक येताच फलाटावर उतरून रेल्वे पोलीसांच्या ताब्यात दिले.ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली फलाट क्र.१ वर घडली.

  डोंबिवली रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.१ वर आलेली लोकल थांबली. लोकलमधील काही प्रवाश्यांनी दोन टपोरी मुलांना पकडून फलाटावर उतरविले. फलाटावर प्रवाश्यांची गर्दी झाल्याचे पाहुन याठिकाणी रेल्वे पोलीस धावत आले. दोन तरुणांना प्रवाश्यांनी पकडून ठेवल्याबद्दल पोलिसांनी विचारले असता हे दोन तरुण लोकलच्या दरवाज्याला लटकून स्टंट करीत असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले.यातील एका तरुणाने लोकलमधील गर्दीचा फायदा घेत लोकलच्या आत गेला.मात्र दुसऱ्या तरुणाला प्रवाश्यांनी पकडल्याने त्याला पळता आले नाही.तो तरुण वारंवार विंनती करत होता मात्र याच्यावर कारवाई करा असे प्रवाश्यांची मागणी होती. पकडलेल्या तरुणाला डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मात्र या तरुणाच्या विरोधात एकही प्रवाश्यांनी लेखी तक्रार केली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या