चालत्या लोकलमध्ये चढताना पडलेल्या महिलेला एमएसएफ मुळे मिळाले जीवदान
डोंबिवली ( शंकर जाधव ) चालत्या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्न करत असताना हात सुटून पडलेल्या महिलेला महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचारी आणि रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर घडली. जीव वाचविणार्या कर्मचार्याचे वरिष्ठ अधिकारी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वरून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करण्यसाठी एक महिला धावत येऊन लोकल मध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र लोकलचा खांब पकडण्याच्या प्रयत्नात तिचा हात सुटल्याने तोल गेल्याने ती फलाटावर पडली आणि लोकल आणि फलाट मधील पोकळीत ढकलली जात असतानाच प्रसंगावधान राखत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान किरण राऊत आणी विवेक पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत या महिलेला फलाटावर खेचून घेत तिचा जीव वाचवला. या दरम्यान या कर्मचार्याचा हात महिलेने घट्ट पकडल्याने तिच्या हाताची नखे देखील त्याच्या मनगटात रुतली मात्र तरीही त्या कर्मचार्याने तिचा जीव वाचविल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या