डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रुग्ण सापडला

 डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रुग्ण सापडला




डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेच्या केपटॉन हुन आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णामध्ये ओमायक्रोनचे व्हेरिएंट सापडले आहेत. यासंदर्भात केडीएमसीचे आयुक्त डॉ.  विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे.महाराष्ट्रातील हा ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आहे.या रुग्णाच्या संपर्कात आलेले हायरिस्क लोरिस्क सर्व जणांचा आम्ही कोरोना चाचणी केली. विमानातील सह प्रवाश्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.  ज्या ओलाने ते आले त्या चालकाचे रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आले आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. लोकांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. फक्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या