राहुरी अर्बन च्या तृतीय वर्धापन दिनी ह भ प आरती ताई शिंदे यांचे जाहीर हरी कीर्तन

 राहुरी अर्बन च्या तृतीय वर्धापन दिनी ह भ प आरती ताई शिंदे यांचे जाहीर हरी कीर्तन 



राहुरी फॅक्टरी - प्रतिनिधी

राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान भव्य महाप्रसाद व किर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे  चेअरमन रामचंद्र काळे यांनी माहिती दिली आहे.

गेली तीन वर्षापासून राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे सर्व सभासद, खातेदार  व ठेवीदारांच्या सहकार्याने राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेने प्रगतीचे शिखर गाठले आहे. व आर्थिक क्षेत्रात नवीन ठसा निर्माण केला आहे.  या संस्थेचा ५ डिसेंबर २०२१ रोजी तृतीय वर्धापनदिन संपन्न होणार आहे.  यानिमित्ताने राहुरी फॅक्टरी येथे ह.भ.प कुमारी भागवताचार्य आरती ताई शिंदे यांचे जाहीर हरीकिर्तन संपन्न होणार आहे.

 कार्यक्रमाचे ठिकाण विठा माधव चित्रपट गृह नजीक  वृंदावन कॉलनी डॉ.शोकोकर हॉस्पिटल समोर येथे होणार आहे. तरी सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक व खातेदार यांनी या कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान चेअरमन रामचंद्र विठ्ठल काळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या