रेल्वे अपघात केडीएमसी कर्मचाऱ्याचा मृत्यू

 रेल्वे अपघात केडीएमसी कर्मचाऱ्याचा मृत्यू 



डोंबिवली ( शंकर जाधव ) रेल्वे गाडी पकडत असताना तोल जाऊन गाडी खाली आल्याने केडीएमसीतील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी डोंबिवली रेल्वे स्थानकात दुपारी  १ वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 मिळालेल्या माहीतीनुसार, नामदेव गावित (५७ ) असे रेल्वे अपघात मृत्यू पावलेल्या केडीएमसी कर्मचाऱ्याचे नाव आहे.गावित हे डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ड्रेसर म्हणून कामाला होते. ते २ वर्षांनी निवृत्त होणार होते.नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी कामावरून घरी जात असताना गावित यांनी  डोंबिवली फलाट क्र.१ वर आले.फलाटावर  दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  अंबरनाथ लोकल आल्यावर लोकल पकडताना गाडीच्या दरवाज्याजवळील दांड्याला पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र दांड्यावरची पकड नीट न बसल्याने गावित यांचा हात दांड्यावरून सटकला.गाडीने वेग घेतल्याने गावित फलाट आणि रेल्वे गाडीवर मध्ये पडले. यात त्यांचा जागीत मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या