डोंबिवलीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास ..

 महापौर भाजपाचाच होणार...



 डोंबिवलीत माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास ..


डोंबिवली (शंकर जाधव ) अनेक वर्षे कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेना - भाजप युतीची सत्ता होती.मात्र मुख्यमंत्री पद कोणाकडे द्यायचे या वादावरून हे दोन्ही पक्ष दूर झाले. केडीएमसीत भाजपने शिवसेनेशी युती तोडून विरोधी बाकावर बसणे पसंत केले.पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने ७५ अधिक उमेदवार उमेदवार निवडणूक आणणार असल्याचा विश्वास पत्रकारांकडे खाजगीत बोलताना व्यक्त केला.मात्र 'हम भी कुछ कमी नाही ' प्रमाणे भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.आगामी निवडणुकीत भाजपाचाच महापौर बसणार असे जाहीर सांगून भाजपचे खासदार व दोन आमदारांनी एकत्रितपणे लक्ष दिल्यास आपला विजय नक्की असल्याचे सांगितले.

   डोंबिवली पूर्वेकडील डोंबिवली जिमखाना येथे  भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील , भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार  गणपत  गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले, संदीप जीलेले जिल्हाध्यक्ष शशिकांतजी कांबळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई,माजी नगरसेवक मंदार हळबे, प्रज्ञेश प्रभूघाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या