बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात MH-०५ प्रवासी संघटना आक्रमक

 बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात  MH-०५ प्रवासी संघटना आक्रमक   

आरटीओ अधिकाऱ्यांना दिले निवेदन




 डोंबिवली ( शंकर जाधव ) रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात अनेक कारणांवरून वाद होत असतात.हे वाद टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग ( आरटीओ )  अधिकारी चव्हाण  यांची  MH-०५ प्रवासी संघटनेने भेट घेतली.या भेटीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांना निवेदन देऊन चर्चा केली. बैठकीत चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना सकारात्मक उत्तरे देत यावर नक्की अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले.बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात  MH-०५ प्रवासी संघटना आक्रमक झाली असून संघटनेचे हे पहिले पाऊल आहे. 


 

   MH-०५ प्रवासी संघटनेच्या संस्थापक/अध्यक्षा- वंदना सिंह सोनावणे सचिव प्रसाद आपटे, सहसचिव प्रथमेश अंकळकोटे व कार्यकारीणी सदस्य प्राची भावे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग ( आरटीओ )  अधिकारी चव्हाण यांची भेट घेतली.या बैठकीत  कल्याण-डोंबिवलीतील प्रवाश्यांच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. मीटर पद्धतीने प्रमाण रिक्षा चालवणे सक्तीचे करावे. . (उप.प्रा.उत्तर: नागरिकाने आग्रह करावे, नकारल्यास संपूर्ण घटनेचा व्हिडियो, ऑटोच्या माहिती सगट, RTO व्हाट्सअप्प नंबरवर पाठवावा, जेणेकरुन कायदेशीर कार्यवाही केली जाईल),CNG व पेट्रोल रिक्षा दरभाडे याची वेगवेगळी नियमावली करणे व दरांचे फलक सर्व रिक्षा स्टॅण्डवर प्रदर्शित करणे. (उप.प्रा.उत्तर: आज उद्या मशे उपलब्ध करण्यात येईल),सर्व रिक्षा युनियनने आपल्या अधिकृत सभासदांना स्वतःचे स्टिकर उपलब्ध करून देणे व रिक्षावर चिकटवणे, जेणे करून अधिकृत व इतरची ओळख होऊ शकेल. नसल्यास दंड सुनिश्चित करावे.(उप.प्रा.उत्तर- तसं न करता आपण आहि कुठलीही तक्रार RTO ला करा आम्ही कार्यवाही करू), प्रत्येक रिक्षात चालकाच्या सिट मागे  ओळखपत्र लिहिलेले असावेत.नसल्यास दंड सुनिश्चित करावे.(उप.प्रा.उत्तर-आहे आवाहन केले असता परत बजावून  सांगू),सर्व अधिकृत युनियनची माहिती आम्हास उपलब्ध करून देणे (उप.प्रा.उत्तर-अशी माहिती युनियन कडून मागवण्यात आली आहे, उपलब्ध होताच, आपणास सोपविण्यात येईल), रीक्षांचा दरवाढीचा/बदलाचा, शासकीय जीआर आम्हास उपलब्ध करून देणे. (शासनाने उपलब्ध करताच आपणास सुपूर्द करण्यात येईल),डोंबिवली ते कल्याण रिंगरूटवर अधिक संख्येने बस सुरू करणे, जेणे करून रिक्षावरचे अवलंबन कमी होईल.(याची संपूर्ण जवाबदारी केडीएमटी कडे आहे. (प्रवासी संगठना याचे पाठपुरावा लवकरच सुरू करेल), भविष्यातील, दरवाढीचा/बदलाच्या सर्व बैठकांमधे,रिक्षा युनियन सोबतच आमच्या प्रवासी संघटनेचा देखील किमान एक प्रतिनिधी, आमंत्रित करण्यात यावा अशी आमची विनंती आहे, जेणे करून आम्ही प्रवाश्यांच्या वतीने मतं मांडू शकू.( उप.प्रा.उत्तर- नक्कीच करता येईल), कल्याण पश्चिम व डोंबिवली पूर्व-पश्चिमला रिक्षा व्यवस्थित पणे उभे अकेल्या जात नसल्याने वाहतूक कोंडी होते ( उप.प्रा.उत्तर: लवकरच तोडगा काढू) या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या