२६/११ भावपूर्ण श्रद्धांजली

 


२६/११

भावपूर्ण श्रद्धांजली


भ्याड सारे आतंकवादी

अमानुष हल्ला  देशावर

हसतमुखाने पोलीसांनी

गोळ्या झेलल्या छातीवर ||१||


गनिमीकावा असा माजला

माणूस रक्ताने भिजला

हिंसाचार पाहूनी क्रूर हा

मृत्यू ही बघा हो लाजला ||२||


थैमान घातले हैवानांनी

कसे होवोनिया नादान

महाग झाली माणुसकी

स्वस्त झाहले हो प्राण ||३||


कित्येक मेले हकनाक येथे

शोषित बॉम्बस्फोटाचे घाव

नराध्यमांचे कृत्य बघूनी

काळजाने सोडला ठाव ||४||



प्रत्येकाला आपल्या कर्माचा

इथेच द्यावा लागतो हिसाब

नव्या जोमाने करू सामना

येऊ कितीही आता कसाब ||५||


साश्रु नयने भावनेने

वाहते मी श्रद्धांजली

समस्त भारतवासीयांकडून

वीरांना त्या आदरांजली ||६||


सौ.अनिता गुजर

डोंबिवली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या