फी वाढीबाबत कल्याणमधील बिर्ला शाळेबाहेर पालकांनी काळया फिती लावून आंदोलन
कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण मधील प्रसिद्ध असलेल्या बिर्ला शाळेबाहेर पालकांनी फी वाढी विरोधात काळ्या फिती बांधून आंदोलन केले .बिर्ला शाळा प्रशासनाने यंदाच्या वर्षी २० टक्के वाढ केली आहे . फी वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप पालकांनी करत शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले.शाळेने फी वाढ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी पालकांनी केली .या आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या पालकांना चर्चेसाठी बोलावले. शाळा प्रशासनाने ही वाढ मागे घेण्यास नकार दिल्याची माहिती पालकांनी दिली .तर यापुढेही शाळे विरोधात आंदोलन करू असा इशारा पालकांनी दिला .शाळेच्या या निर्णया विरोधात शिक्षण मंत्र्यांसह न्यायालयात धाव घेनार असल्याचा इशारा पालकांनी दिला .तर याबाबत शाळा प्रशासनाने कोरोना काळात २०१९ पासून आम्ही कोणतीही फी वाढ केली नव्हती .यंदा नियमानुसार फी वाढ केली आहे .ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना फी मध्ये सवलत देण्यात आली आहे,तसेच चार ते सहा टप्प्यात फी भरण्याची मुभा दिली आहे .फी वाढी संदर्भात न्यायालयात प्रकरण असून न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले .

0 टिप्पण्या