शिवाजी पाटणे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

 शिवाजी पाटणे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर 



मुंबई - एशियन इंडिपेंडंट ऑनलाईन लघुपट महोत्सव  नुकताच साजरा झाला, यामध्ये  शिवाजी पाटणे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. "नो बजेट प्रॉडक्शन" निर्मित, अंजली दिलीप लिखित आणि रायबा अंजली दिलीप दिग्दर्शित "बाबा ... ते" या लघुपटात हृदयस्पर्शी अभिनयासाठी शिवाजी पाटणे यांची निवड झाली. 


एका दिव्यांग मुलीच्या बापाची व्यथा त्यांनी यारील आपल्या अभिनयातून जिवंत केली आहे. 

शिवाजी पाटणे यांनी "भस्म्या", "अस्तित्व" , "फ्रोझन टियर्स" या लघुपटातील अविस्मरणीय अभिनयामुळे पारितोषिके पटकावलेली आहेत. त्यांनी "काॅपी", "मध्यमवर्ग" इत्यादी चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका केल्या आहेत, तर तुझ्या ईस्काचा नाद खुळा, अग बाई सासूबाई, माझ्या नवऱ्याची बायको, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळू मामाच्या नावानं चांगभलं इत्यादी मराठी मालिकांच्या दुनियेत ते ओळखीचा चेहरा आहेत. लवकरच एशियन इंडिपेंडंट ऑनलाईन लघुपट महोत्सवाचा पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करून, सदर कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जातील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या