कै.भिकूभागशेठ नर स्मृती चॕरीटेबल ट्र्स्ट यांच्या सहकार्याने निराधारांना मोफत अन्नधान्याचे वाटप.

 


बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शाखा क्र. ७७ तर्फे कै.भिकूभागशेठ नर स्मृती चॕरीटेबल ट्र्स्ट यांच्या सहकार्याने निराधारांना मोफत अन्नधान्याचे वाटप.                               जोगेश्वरी -हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना शाखा क्र.७७ मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.स्मृतीदिनानिमित्त शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते विभागातील गरजू व निराधार लोकांना मोफत अन्न धान्य कीटचे वाटप या विभागाचे नगरसेवक बाळा नर यांच्या माध्यमातून व आयोजनाखाली करण्यात आले. अद्यापपर्यत विभागातील पाचशे रहीवाशांना मोफत  धान्य देण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी कै.भिकू भागशेठ नर स्मृती चॕरीटेबल ट्रस्टच्या वतीने सहकार्य करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक बाळा नर, विधानसभा संघटक रचना सावंत, विधानसभा समन्वयक रविंद्र साळवी, प्रियंका आंबोळकर (उपविभाग संघटक),

नंदकुमार ताम्हणकर (शाखाप्रमुख), शैलजा नरवणकर (महिला शाखा संघटक), डाॅ. पोतनिस, उदय हेगिस्टे, रिटा राघवा व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या