डोंबिबलीत अचानक गरिबांचे केशरी कार्ड झाले पांढरे ...महिलांनी विचारला शिधावाटप अधिकाऱ्याला विचारला जाब

 डोंबिबलीत अचानक गरिबांचे केशरी कार्ड झाले पांढरे ...महिलांनी विचारला शिधावाटप अधिकाऱ्याला विचारला जाब 



डोंबिवली ( शंकर जाधव )   कोरोना काळात झालेल्या टाळेबंदीत गरिबांसाठी केंद्र व राज्यसरकारने मोफत धान्य देण्याची नुसती घोषणा केली नाही तर त्यांच्यापर्यत धान्य पोहचण्याची सुविधेवर लक्ष ठेवले. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसताच सरकारने टाळेबंदीत काहीशी शिथिलता आणली. एकीकडे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आले असताना दुसरीकडे मात्र केशरी शिधाधारक पत्रिका पांढऱ्या शिधाधारक पत्रिकेत रूपांतरित केल्याने  गरिबांना धान्य मिळणे मिश्किल झाले आहे. आधीच नोकरी गेल्याने बेकार झालेल्या डोंबिवलीत मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांची संख्या जास्त आहे.त्यात शिधापत्रिका मधील घोळ दिसून आल्याने डोंबिवलीकर नागरिकांनी आवाज उठविला. डोंबिवलीत ग्रामीण मधील भाजप महिला पदाधिकारी सुहासिनी राणे, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील,राजश्री पांजणकर यांसह अनेक महिलांनी डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई येथील शिधावाटप कार्यालयात शिधावाटप अधिकारी एकनाथ पावर यांची भेट घेऊन जाब विचारला. महिलांचे म्हणणे ऐकल्यावर पवार यांनी याबाबत वरिष्ठांना कळवले जाईल असे सांगितले. तसेच काही अडचणी असतील तर त्या सोडवून गरिबांना शिधा नक्कीच मिळेल अशी ग्वाही यावेळी पवार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या