कल्याण गुन्हे शाखा घटक-३ ची यशस्वी कामगिरी, अनोळखी आरोपीस केले जेरबंद..
प्रतिनिधी : प्रविण बेटकर
कल्याण कोळसेवाडी पोलिस स्टेशन येथील गुन्हे रजि.नं. ६१६/२०२१, भा.द.वि.कलम ३२४,५०४,३४ मधील अनोळखी आरोपीला कल्याण गुन्हे शाखा घटक-३ यांनी अटक केली आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादिवर अनोळखी आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याने फिर्यादी सायन हॉस्पिटल, मुंबई येथे उपचाराकरिता दाखल आहे. कल्याण गुन्हे शाखा घटक-३ यांचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क करून मिळालेल्या वर्णनानुसार व गोपनीय माहितीच्या आधारे ग्राउंड लेव्हल पर्यंत सखोल तपास करीत संशयित इसम- किरण सखाराम जाधव, वय-३० वर्षे, रा.साई सिद्धी झोपडपट्टी, कोपर स्टेशनच्या कॅबिन जवळ, डोंबिवली (पू.) हा कल्याण परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी साफला रचून त्याला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले, सदर कबुलीत त्याने मी गुन्हा केला असल्याचे कबूली दिली. प्राप्त माहितीनुसार किरण जाधव या गुन्हेगारावर टिळकनगर पो.ठाणे, डोंबिवली पो.ठाणे, मानपाडा पो.ठाणे, कोळसेवाडी पो.ठाणे तसेच दादर पो.ठाणे इत्यादी पोलीस ठाण्यात गुन्हे असल्याचे उघडणीस आले. सदर आरोपीस गुन्हांच्या पुढील तपासनीस कोळसेवाडी पो.ठाणे येथे रिपोर्टसह हजर केले. या घटनेची वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उत्तम कामगिरी कल्याण गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे वपोनि/श्री.मनोहर पाटील, सपोनि/भूषण एम. दायमा, पोउनी/ मोहन कळमळकर, सपोउपनी/संजय माळी, पोना/गुरुनाथ जरग, पोहवा/विश्वास माने, सचिन साळवी, अनुप कामत, पोशि/मिथुन राठोड यांनी केली.

0 टिप्पण्या