मतदार नोंदणीसाठी पालिका आयुक्तांनी गायले गीत
डोंबिवली ( शंकर जाधव ) स्थानिक स्वराज संस्था ,विधानसभा आणि लोकसभा मतदार निवडणुकीत मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी सर्व राजकीय पक्ष आवाहन करत असतात.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुक प्रत्येक मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आगळीवेगळी शक्कल लढवली.आयुक्तांनी स्वतः गीत गाऊन मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाच्या मुलभूत हक्कापासून मतदार राजा वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी अभियान सुरु आहे.या अभियानाला अधिक चालना देण्यासाठी महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियोजनबध्द्व केलेली, दत्तात्रय लदवा लिखित, " चला चला..... मतदार नोंदणीला " या आशयाचे गीत(गाणे) स्वत:च्या आवाजात गायले. मतदार नोंदणी अभियानात सहभागी होऊन 30 नोव्हेंबर पर्यंत आपला मतदार नोंदणी अर्ज सादर करुन मतदानाचा हक्क अबाधित राहण्यासाठी मतदान नोंदणी अभियानाला प्रतिसाद देण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी या गीतातून केले आहे.

0 टिप्पण्या