जो भित्रा असेल तो पक्ष सोडेल...काँग्रेस प्रदेश सचिवांचे वक्तव्य ...
डोंबिवली ( शंकर जाधव )
आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना विविध राजकीय पक्षांमध्ये आयराम-गयाराम सुरु झाले आहे.प्रत्येक पक्षाला आपले माजी नगरसेवक पक्ष सोडून जातील का ?किती नगरसेवक पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे.मात्र ज्यांना काँग्रेस पक्ष सोडण्याची इच्छा असेल त्यांना महाराष्ट्र काँग्रेस सचिव संतोष केणे यांनी चांगलाच टोला लगावला आहे.देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचा खूप मोठा सहभाग होता.म्हणूनच जो सच्चा कार्यकर्ता असतो तो कधीच काँग्रेस पक्ष सोडणार नाही. जो भित्रा असेल तोच पक्ष सोडेल असेल असे वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे यांनी केले.भारतीय संविधान दिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील निळजे स्टेशन जवळील लोढा हेवन येथील गावदेवी चौकातील काँग्रेस जिल्हा सरचिटणीस शामराव यादव यांच्या कार्यालयात संविधान दिनानिमित्त इ श्रम कार्ड आणि मतदार नोंदणी शिबीर भरविण्यात आले होते.यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे आले होते.त्यावेळी केणे यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते कधीच पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस श्यामराव यादव, एकनाथ म्हात्रे, शशिकांत चौधरी,अजय पौळकर,शरद भोईर, प्रणव केणे, राहुल केणे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.यावेळी
अजय पैळकर, शशिकांत चौधरी, एकनाथ म्हात्रे, अजय भोईर,शरद भोईर, प्रणव केणे, राहुल केणे, मंगेश रुके,मनोज यादव, प्रवीण कदम, अभिषेक मोहिते, प्रशांत मोरे, कुणाल रंगारी,लक्ष्मीनारायण, शर्माजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पण्या