शेअर रिक्षा व मीटर रिक्षा आकारणी पुर्ववत चालू करा




( कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

मानव अधिकार विभागाची मागणी)


डोंबिवली ( शंकर जाधव )  कोविड-१९ प्रादुर्भाव कमी झालेला असून त्यामुळे शासनाने जे नियम व अटी लागु केल्या होत्या त्या शिथील करण्यात याव्यात. तसेच शेअर रिक्षा व रिक्षा मीटर आकारणी पुर्ववत करण्यासाठी गंभीर दखल घेवुन येथील प्रवासी वर्गास योग्य तो न्याय मिळवुन दयावा अशी मागणी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मानव अधिकार विभाग डोंबिवली पश्चिमचे अध्यक्ष संजय पाटील यांनी परिवहन सह आयुक्तांकडे केली आहे.


याबाबत संजय पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, शेअर रिक्षा व मीटर रिक्षा आकारणी पुर्ववत चालू करावी कारण कोविड-१९ प्रादुर्भाव कमी झालेला आहे. पूर्वी दि.२० मार्च २०१९ पासुन आपल्या येथे कोविड-१९ चालु झाला होता. त्यावेळी शासनाच्या नियमानुसार रिक्षा प्रवासी संख्या ही मर्यादित केली होती. त्यामुळे प्रवासी वर्गास जास्त भाडे दयावे लागत असे. आता कोविड-१९ प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्यामुळे शासनाने जे नियम व अटी लागु केल्या होत्या त्या शिथील करण्यात याव्यात.  जेणेकरून शेअर रिक्षा व रिक्षा मीटर आकारणी पुर्ववत करण्यासाठी गंभीर दखल घेवुन येथील प्रवासी वर्गास योग्य तो न्याय मिळवून द्यावा अश्या मागणीचे पत्र पाटील यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या