मोदींनी महिलांना पुन्हा चूल पेटवण्यास मजबूर केले.कांग्रेस कमिटी महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांची टीका

 मोदींनी महिलांना पुन्हा चूल पेटवण्यास मजबूर केले.कांग्रेस कमिटी महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांची टीका महिला कांग्रेसचे महागाई विरोधात धरणे आंदोलन


कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण महागाईचा सर्वात जास्त फटका महिलांना पडला आहे. अन्न धन्यासोबतच गॅस सिलेंडरचे भाव भरमसाठ वाढल्याने पुन्हा महिलांना धुर खाण्यास मजबूर केले असून उज्जवला योजना ही महागाईमुळे मागे पडली आहे तर ४० टक्के महिलांनी चूल पेटवण्यास मजबूर केली असल्याची टीका महिला जिल्हाध्यक्ष कोधन कुलकर्णी यांनी टीका केली.वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जनजागरण अभियानाअंतर्गत महिला काँग्रेस कमिटी तर्फे कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलकर्णी यांनी महागाईमुळे समजाला आणि सर्वात जास्त महिलांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत आपले मत मांडत मोदी सरकार यांच्यावर टीका केल्या.

नाना पटोले यांच्या आदेशानूसार संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण आंदोलन सुरु आहे देशात वाढलेल्या पेट्रोल, डीजेल, खाद्य तेल, अन्नधान्य आणि गस सिलेंडर यांचे वाढलेल्या भावा संदर्भात महिला काँग्रेस तर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले. रविवारी कल्याणमध्ये देखील पदयात्रा होती. या पदयात्रेला जनतेने प्रतिसाद दिला -असून मोदि सरकारविषयी असलेला रोष दिसून आला. सर्वसामान्यांचा आवाज मोदी सरकार पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत आंदोलन हे सुरु राहणार असल्याचे कांग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी धरणे आंदोलनात महिला कार्यकत्यांचा मोठा सहभाग घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या