सोज्वळ, मिश्किल व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड

माजी पोलिस इन्स्पेक्टर महादेव सोमा सावंत यांचे दुःखद निधन 



सोज्वळ, मिश्किल व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड  




(लोकसत्यवाणी न्युज २४-११-२०२१)


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे महम्मदवाडी येथे जन्मलेले  माजी पोलिस इन्स्पेक्टर महादेव सोमा सावंत यांचे आज दुपारी वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने गोरेगांव मुंबई येथे दुःखद निधन झाले. आज त्यांच्या जाण्याने कुटुंबातील व्यक्तीवर व गावावर शोककळा पसरली आहे. 

नरडवे महम्मद वाडीतील अजून एक जुनेजाणते जेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. महादेव सोमा सावंत आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे हे अण्णा, 

     महंमदवाडीत जन्मलेल्या या पितृतुल्य अशा अण्णांच्या जाण्याने गावावर, वाडीवर दुःखाची शोककळा पसरली आहे, प्रत्येकाला हवेसे वाटणाऱ्या या व्यक्तिमत्वापासून आम्ही आज पोरके झालो आहोत, याचे आम्हा वाडीतील सर्वांनाच दुःख होत आहे.



सार्वजनिक कामात अण्णांचा फार मोठा सिहांचा वाटा होता, नरडवे धरणग्रस्त समितीच्या सभेसाठी मुंबई किंवा गावी असतानाही ते आवर्जून सभेस उपस्थित राहायचे, सार्वजनिक प्रत्येक कामांत ते अग्रेसर होते. त्यांनी मोठ्या जिद्दीने गरिबीतही चांगले शिक्षण घेऊन पोलीस डिपार्टमेंट मध्ये एका चांगल्या पोस्टवर ते कार्यरत झाले होते,  मात्र त्यांच्या वागण्यात मला अहंकार, किंवा गर्विष्ठपणा कधीच दिसला नव्हता. आमच्या वाडीतील ते भूषणीय आदर्श व्यक्तिमत्व होते,  एक सोज्वळ व्यक्तीमत्व आमच्यातून हरपले आहे.

   पोलिस इन्स्पेक्टर असूनही ते एक हळव्या मनाचे व्यक्तीमत्व होते, अडीअडचणीस धावणारे, मदत करणारे, आणि विशेष म्हणजे गावात पूजापाठ असो वा लग्नसमारंभ अथवा गणपतीची भजने असोत, यात आनंदाने हसतमुखाने ते सहभाग घेऊन भजनात तल्लीन होणारे, मिश्किल स्वभावाचे असे श्रद्धाळू व्यक्तिमत्त्व आमच्यातून आज निघून गेले, याचे आम्हा सर्वांनाच दुःख होत आहे, कारण त्यांच्या जाण्याने वाडीत, गावात अजून एक पोकळी निर्माण झाली आहे, ही  कधीच भरून येणार नाही.  अशी माणसे आम्हा परत कधीच मिळणार नाहीत, यांचेच आम्हास दुःख होत आहे,


त्यांच्या कुटुंबियांना दुःख पचविण्याची शक्ती मिळो!

व कै. महादेव सोमा सावंत यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!


 (सागोसूत हरिसंतोष )



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या