क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी!
विश्वनाथ पंडित
विश्व हिंदू परिषद - ठाणे पूर्व प्रखंड द्वारा सामाजिक समरसता अभियान आयाम अंतर्गत आणि स्वराज सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे पूर्व येथे आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची 227 वी जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. संतोष सगट (लहुजी शक्ती सेना, अध्यक्ष ठाणे जिल्हा), पत्रकार योगेश भाऊ नवगिरे हे उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व तरुण भारत वृत्तपत्राच्या योगीताताई साळवी यांनी आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांचे जीवन कार्य व सद्याच्या सामाजिक स्थितीबद्दल आपले विचार मांडले. क्रांतिकारकांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे होते म्हणून त्यांना आद्य क्रांतिगुरु म्हणतात. वस्ताद लहुजी साळवे कोणत्याही एका समाजाचे न होता ते सर्वसमाजाचे व्हावे यासाठी अशा प्रकारच्या जयंतीच्या कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार व्हावा असे त्यांनी विचार मांडले.
या प्रसंगी विश्व हिंदू परिषद ठाणे जिल्हा मंत्री श्री. विश्वास सावंत, ,वि.हिं.प. ठाणे जिल्हा सामाजिक समरसता अभियान संयोजक श्री. सचिन मालविया आणि वि.हिं.प. जिल्हा पदाधिकारी टीम ठाणे पूर्व प्रखंड टिम हे उपस्थित होते.
तसेच स्वराज्य सामाजिक सेवा संस्थेचे श्री. आनंद कोळी आणि स्वराज संस्थेचे कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.

0 टिप्पण्या