डोंबिवली ( शंकर जाधव ) काँग्रेसचे कल्याण-डोंबिवली मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड यांचे गुरूवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान निधन झाले.
मृत्यूसमयी ते ५६ वर्षांचे होते. काही दिवसांपुर्वी ब्रेनस्ट्रोकचा त्रस झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँगेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव, काँगेस नेते एकनाथ म्हात्रे, पॉली जेकब, आरपीआयचे जेष्ठ नेते बी. के. जाधव, आदी विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या