अभिनेत्री कंगना राणावतचा डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर निषेध

 अभिनेत्री कंगना राणावतचा डोंबिवलीत  राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर  निषेध



डोंबिवली ( शंकर जाधव )लाखो स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या शहिद स्वातंत्र्यवीरांचा अपमान करत, कंगना राणावत या अभिनेत्रीने १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होते, तर भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ मिळाले असे बेताल विधान केल्याने  कंगना राणावतचा डोंबिवलीत  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जाहीर निषेध केला.

 डोंबिवली विधानसभा क्षेत्र शहर अध्यक्ष सुरेश जोशी  यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर अध्यक्षा तनुजा  पाटणकर व कार्याध्यक्षा कोमल  भागडे यांच्या अध्यक्षतेखाली  कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्षा वंदन सोनवणे यासह पदाधिकारी अनिशा गुप्ते,  मोहिनी चौधरी, भावनाबेन राठोड,  प्रणाली शेंबेकर, दिपाली आंबेरकर, सुधा शेटे, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन भोईर, पांडुरंग चव्हाण, राहुल चौधरी, रमेश दिनकर, उदय शेट्टी,  शशिकांत म्हात्रे (तांडेल),मंगेश जाधव, निवृत्ती भागडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या