अक्षय करपे यांचा अविरत सेवेबद्दल भव्य दिव्य गौरव
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील टाकळीमिया पत्रकार संघाचे अध्यक्ष अक्षय करपे यांचा.स्वराज्य ग्रुप तसेच युवा सेनेच्या वतीने कोरोना काळात आपल्या अविरत सेवेबद्दल भव्य दिव्य गौरव करण्यात आला याप्रसंगी समर्थ दूध संकलन केंद्राचे चेअरमन आणि टाकळीमिया शिवसेना शहराध्यक्ष उमेश भाऊ कवाणे कार्यक्रमा प्रसंगी म्हटले आहे टाकळीमिया पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकार अक्षय करपे यांचे कोरोना काळातच नाही तर कायमस्वरूपी पत्रकारितेचे काम निस्वार्थ भावनेने व निर्भिड आहे सर्वसामान्यांचे न्याय हक्कासाठी पत्रकार अक्षय करपे हे आपल्या रोखठोक शैलीतून भल्याभल्यांना घाम फोडतात त्यांच्या पत्रकारितेचा प्रत्येक पत्रकाराने आदर्श घेतला पाहिजे त्यांचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे यावेळी पत्रकार अक्षय करपे त्यांनी पुढे बोलताना म्हटले की आज पत्रकारिता ही पैशाच्या मोहापायी लोप पावलत चालली आहे आधी ज्या पत्रकारितामध्ये धार होती ती आता राहिलीली नाही आज समाजामध्ये अनेक पत्रकार पैशासाठी चांगल्या बातम्या छापत नाही टाकळीमिया पत्रकार संघाचे अध्यक्ष अक्षय (बबलू) करपे यांनी म्हटले की माझ्या पत्रकारितेचा मूळ उद्देश आहे की कोणत्याही गरिबावर सर्वसामान्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे सर्वसामान्यांचे न्याय हक्कासाठी वाटेल ते करायला मी.तयार .असतो सत्कार समारंभी प्रसंगी उपस्थित स्वराज्य ग्रुप शिवसेना सचिन दादा करपे राहुरी तालुका युवा सेनाप्रमुख रोहन भाऊ भुजाडी समर्थ दूध संकलन केंद्राचे व्हाईस चेअरमन महेश घोरपडे टाकळीमिया शिवसेना शहराध्यक्ष उमेश भाऊ कवाने कट्टर शिवसैनिक सुनील कवाने ओंकार करपे संदीप करपे राम शिंदे चैतन्य ढगे मनोज बेलदार गोरक करपे अमोल हारदे योगेश बेल्हेकर अमोल ठेंगळ कुणाल करपे प्रशांत करपे आदी उपस्थित होते

0 टिप्पण्या