कै.लक्ष्मीबाई तुकाराम माळी चौकाचा उदघाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न
मुंबई - शिवसेनेचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत,शिवसेना उपनेते, मुंबई पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व भायखळा विधानसभेचे आमदार यामिनी जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच प्रभाग क्रमांक २१० स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या नगरसेवक निधीतून व शिवसेनेचे माजीनगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने कै. लक्ष्मीबाई तुकाराम माळी चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. या चौकाचा उदघाटन व लोकार्पण सोहळा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी शिवसेना माजी नगरसेवक मनोज जामसुतकर,सुर्यकांत पाटील,उपविभाग प्रमुख विजय कामतेकर, विधानसभा महिला संघटक चंदना साळुंखे,विधानसभा संघटक राजू फोडकर, शाखाप्रमुख दिलीप सावंत, वैभव मयेकर, उपविभाग संघटक कल्पना सुर्वे,शाखा संघटक सुमन साखरकर, उपशाखा संघटक रेणुका तिवरकर,अ. वाहतूक सेना उपाध्यक्ष द.मु.संजय डाकी, समाजसेवक रंजन माळी, वाघू काका,प्रविण ठाकुर, डॉ.इफतिकार, उपशाखा प्रमुख जेठाभाई राठोड,भरत सोलंकी,किशोर शेलार, जगदीश नलावडे,जितेंद्र बोरीचा,महिला उपशाखा संघटक विद्या राबडिया, सुनीताताई भोगले,युवासेना पदाधिकारी अमित मालवणकर,यतिन गवस, शिवसैनिक राजेश जामसुतकर आदी मान्यवर व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या