नाट्य परिषद कल्याण शाखेचे रविंद्र सावंत यांनी व्यक्त केली खंत:

 नाट्य परिषद कल्याण शाखेचे रविंद्र सावंत

यांनी व्यक्त केली खंत 

 


    डोंबिवली(प) नाट्य कट्टा आयोजित मराठी रंगभूमी दिन कार्यक्रमात बोलताना अ.भा.म.ना. प.कल्याण शाखेचे प्रमुख कार्यवाह रविंद्र सावंत यांनी मराठी रंगभूमीवर घडणाऱ्या स्थित्यंतरे यावर भाष्य केले.आज रंगभूमीवर दर्जेदार लेखक नाही अशी बोंब आहे मात्र नवीन होतकरू लेखक चांगल्या एकांकिका देत आहेत.आज रंगभूमीवरची स्पर्धा खूप मोठी आहे आणि व्यापक आहे.नवीन कलावन्त NSD, ललित कला अकादमी,किंवा मुंबई,औरंगाबाद युनिव्हर्सिटी मधून नाट्य शास्त्र विषयाची डिग्री घेऊन रंगमंचावर येत आहेत.अर्थात कालांतराने ही मंडळी मालिका सिनेमाकडे वळतात.याला कारण रणभूमीवर आलेली उदासीनता. दर्जेदार आणि जास्त कलावन्त असलेले नाटक करताना खर्चाची बाजू सुद्धा मोठी असते.सर्वसाधारण निर्माता ही बाजू पेलण्यास असमर्थ ठरतात.प्रस्थापित निर्माते हे फक्त नामवंत कलावंतांना घेऊन नाटक सादर करीत असतात.यात उदयोन्मुख कलाकारांना म्हणावी संधी उपलब्ध होत नसते.कल्याण डोंबिवली या सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या ऐतिहासिक शहरांनी मराठी रंगभूमिला आजवर अनेक कलाकार ,दिग्दर्शक, तंत्रज्ञ दिले आहेत.मात्र ही मंडळी आजकाल मालिकेच्या मागे पळताना दिसत आहेत.कल्याण डोंबिवली शहरात दोन अद्ययावत थिएटर आहेत.परंतु इथल्या कलाकारांना नाटकाच्या तालमी करीता जागा मिळत नसतात.नाट्य परिषद कल्याण शाखा आणि डोंबिवली शाखा यांनी या करिता वारंवार महापालिकेजवळ पाठपुरावा केला आहे.मात्र अजूनही ठोस कार्यक्रम राबविला जात नाही.तसेच कल्याणात अत्रे कट्टा व डोंबिवलीतील नाट्य कट्टा आज दुरावस्थेत आहेत.रंगकर्मी ना एकत्र येऊन नवीन विषयावरील चर्चा तथा घडामोडी घडविण्यासाठी अशा जागा असणे फार गरजेचे असते.विचारांची देवाणघेवाण या अशा ठिकाणीच होत असतात.प्रशासनाला माझी विनंती आहे आपल्या शहरातील सांस्कृतिक विकासात या काही अनिवार्य गरजेच्या बाबी आहेत त्यात आपण लक्ष घालून या अडचणी दूर कराव्यात.तसेच नाट्य निर्मात्यांना सुद्धा विनंती आहे होतकरू उदयोन्मुख कलाकारांना योग्य मानधन वेळेवर मिळण्याची व्यवस्था करावी.पूर्णवेळ कलावंतांना उवजीविकेच दुसरे साधन नसते.कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक कलावंतांची उपासमार होत आहे.आज नाट्यगृह ५०%क्षमतेने सुरू झाले असले तरीही लोककलावंत,वाद्यवृंद यांना न परवडणारे भाडे भरून कार्यक्रम सादर करणे धोक्याचे वाटत आहे.शासन,प्रशासन आणि रसिक मायबाप आपण सर्वानीच याची दखल घ्यावी ही विनंती.

    रविंद्र सावंत हे नाट्य परिषद कल्याण शाखेचे प्रमुख कार्यवाह असून स्वतः अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत.१९८६पासून ते कल्याण शहरातून हौशी रंगमंचावर वावरत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धांचे समनवयक, परीक्षक म्हणून ते काम पाहतात.अनेक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.व्यावसायिक नाटक,मालिका,चित्रपटातुन भूमिका केल्या आहेत.मराठी रंगभूमी दिनी नाट्य कट्टा डोंबिवलीच्या व्यासपीठावरन त्यांनी आज त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली...

त्याच प्रमाणे नाट्य कलाकार भरती ताम्हणकर यांनीही कलाकारांच्या कथा आणि  व्यथा कथन केल्या.


गुजराती कलाकार निरंजन पंड्या  यांनीही आपले विचार मांडले




कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश चव्हाण-उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर जिल्हा चित्रपट,साहित्य,कला,सांस्कृतीक सेल रा काँग्रेस पा.यांनी केले होते. 

.......



सुनीता काटकर यांचीही या कामी मोलाची साथ लाभली. तसेच सुनीता काटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.





तसेच या कवी पत्रकार संतोष सावंत यांनी कलाकारांना विचारले की, सध्याच्या असलेलेल्या या पत्र्याच्या वास्तूला एक भव्य रूप यायला पाहिजे यासाठी आपण कलाकार मंडळी एकत्रित येऊन पुढे काही करणार आहात की नाही, त्यावर अनेकांनि आपल्या मनातल्या वेदना बोलवून दाखवल्या, याकरिता सर्वप्रथम महापालिका यांनीं लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच सांस्कृतिक विभागाने कलाकारांच्या बाबतीत विचार करायला हवा, पत्रव्यवहार करूनही कलाकारांच्या वेदना कुणी समजून घेत नाही, असे काहींनी बोलवून दाखवले. राजस्थानी कलाकार सुखनराज राठोड यांनी एक हिंदीतून गीत सादर केले


या प्रसंगी हेमंत यादगिरे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष चित्रपट,साहित्य,कला,सांस्कृतिक सेल NCP, स्वप्नील भिसेकर, करुणा कातखडे, रोहित सामंत, सुरेश जोशी, नंदू गाडगिळ, सुधीर वैद्य, विजय चौघुले, सुहास नवरे, रविकांत भातखंडे,सुरेश सरदेसाई, डॉ. संजय रणदिवे, दुर्गाराज जोशी, निरंजन पंड्या, सुखनराज राठोड,रमेश भिडे, ज्येष्ट कलाकार सु.श्री. इनामदार  दिलीप गुजर,दीपाली काळे,शुभदा गोडसे, विवेक ताम्हणकर, निशिकांत रानडे, बापू राऊत, संकेत ओक, दुर्गाराज जोशी, निखिल वैद्य, सुवर्णा केळकर, भाग्यलक्ष्मी पडसलगीकर, नाट्यकलाकार संतोष सावंत व इतरही अनेक कलावंत तसेच जिहा सरचिटणीस रोहित सामंत,राष्ट्रवादी पक्षाचे 143 विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी , सिनेकलावंत गोवर्धन भोईर, रमेश चव्हाण,शशिकांत म्हात्रे, निमिष पाटील, यांनाही आयोजक प्रकाश चव्हाण यांनी सर्वाचे आभार मानत गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या