जीवघेण्या गतिरोधकाने वाहनचालक जखमी...
पालकमंत्र्यांना ट्वीट करून दिली माहिती ..
डोंबिवली ( शंकर जाधव ) अपघात होऊ नये आणि वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी पालिका रस्त्यांवर गतिरोधक लावते.परंतु या गतिरोधकानेच अपघात होत असल्याची वास्तविकता डोंबिवलीत समोर आली आहे.डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर रोडवरील उस्मा पेट्रोलपंपासमोरील गतीरोधक हे जीवघेणे ठरत आहे.रविवारी रात्री एक वाहनवाहक या ठिकाणी पडल्याने जखमी झाला.याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्वीट केल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले.
मिहीर निक्ते हा तरुण रविवारी रात्री डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर रोडवरील उस्मा पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना गतीरोधकाला धडकून जखमी झाला. या अपघातात त्याच्या हातात व पायाला जोरदार मार लागला.रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसावा याकरता त्यावर पांढरेपट्टे रंगविले जातात.मात्र येथील गतिरोधकावर पांढरेपट्टे रंगविले नसल्याने मिहिरला याचा अंदाज आला नाही.मिहीरचे काका अजय निक्ते यांनी याबाबत पालकमंत्री शिंदे, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण,आमदार प्रमोद ( राजू ) पाटील,ठाणे जिल्हा ट्रॅफिक ऑफिस,ठाणे तहसीलदार,केडीएमसी स्मार्टसिटी यांना निक्ते यांनी ट्वीट करून सदर परिस्थितीबाबत माहिती दिली.काही वेळातच प्रशासनाने याची दाखल घेत सदर रोडवरील गतिरोधकावर पांढरेपट्टे रंगविले.

0 टिप्पण्या