माजी नगरसेवकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी....
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक संदीप गायकर विरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकी व सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करत एका पीडित तरुणीने केडीएमसीचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. उच्च न्यायालयाने संदीप गायकर यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने सोमवारी रात्री संदीप गायकर बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर अटक करण्यात आली .संदीप गायकर हा दोन महिन्यांपासून फरार होता .संदीपचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता .मंगळवरुई पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात संदीपला हजर करण्यात आले.न्यायालयाने संदीपला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Byte : क्रांती रोठे ( वकील )
0 टिप्पण्या