ऐतिहासिक गडांवर शासनाचे अजूनही दुर्लक्ष,
जिल्यातील पुरातन विभागकडे वेळ नाही
सिधुदुर्ग जिल्यातील कुडाळ तालुका मु पोस्ट सोनवडे घोडगे येतील सोनगड हा शिवाजीराजे महाराज यांच्या पदप्रश्नाने सोनवडे दुर्गनगर या सह्याद्रीच्या उंच कड्या पर्वतरांगा सुंदर स्वछ निसर्ग आशा या वातावरणात महाराजांनी केलेली गडाची निवड,अशी चारही बाजूने तठबदी ही देखण्या जोगे आहे पण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटक जिल्हा म्हणून घोषित करून अनेक वर्षे झाली तरी पण या गडावर लक्ष्य द्यायला जिल्यातील पुरातन विभागकडे वेळ नाही अशी खंत तेथील ग्रामस्थ श्री यशवंत श्याम सावंत यांनी वक्त केली तरी शासनाने लवकरात लवकर या कडे लक्ष देऊन तो जगाच्या नकाशावर आणावा व आथिर्क निधी मंजूर करून गडाची डागडुजी करावी व इतिहास कालीन असलेल्या अवशेषांचा संरक्षण करावे तेथे पोचण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते तरी पंच क्रोशीतील लोकांची मागणी आहे की जाण्यासाठी रस्त्याची किंवा पायवाट तरी निदान व्यवस्थित करावी. तेथे असलेल्या देवता इतर देव या साठी एक मंदिर बांधणे, पाण्याची व्यवस्था नाही. आजही येते इतिहास कालीन पाऊलखुणा आढळतात या गडावर असलेली देवता आजही नवसाला हाकेला धावणारी म्हणून प्रसिद्ध आहे.
0 टिप्पण्या