लेवा गणबोलीच्या संवर्धनासाठी आपण जाणीवपूर्वक वाचले , लिहिले व बोलले पाहिजे : संमेलनाध्यक्ष इतिहासकार डॉ.नि.रा.पाटील
जळगाव :- प्रतिनिधी
बहिनाबाईंच्या गाण्यांनी आपल्या बोली भाषेला जागतिक पातळीवर ओळख मिळाली , लेवा गणबोलीचा अनमोल ठेवा आपल्याला लाभलेला आहे, तिचे संवर्धन करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक लिहिले , वाचले आणि बोलले पाहिजे असे सांगून " बहिणाबाईंची गाणी लेवा गणबोलीत नसून तावडी बोलीत आहेत असे विधान करणे म्हणजे लेवा गणबोलीवर अधिक्रमण आहे.तावडी भाषेची झुल लेवा गणबोलीवर पांघरण्यासारखे आहे ", असे प्रतिपादन दुसऱ्या लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इतिहासकार , जेष्ठ संशोधक , साहित्यिक डॉ.नि.रा.पाटील ( मुंबई ) यांनी केले.
दुसरे लेवा गणबोली
साहित्य संमेलन येथील यशवंतराव मुक्तांगण हॉल येथे संपन्न झाले , त्यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ.पाटील हे आपल्या भाषणात बोलत होते.
संमेलन स्थळाला
( गायक -कवी सोपानदेव चौधरी साहित्यनगरी ) असे नाव देण्यात आले होते.
कादंबरीकार दिवाकर चौधरी व्यासपीठावर हा शब्दोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला..
या संमेलनाचे उदघाटन जळगावचे आमदार सुरेश उर्फ राजुमामा भोळे यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील होते.तर संमेलनाचे मुख्य संयोजक कलावंत व कवी तुषार वाघुळदे तर निमंत्रक डॉ.अरविंद नारखेडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नारखेडे तर पाहुण्यांचे स्वागत व परिचय तुषार वाघुळदे यांनी करून दिला.
व्यासपीठावर पीपल्स बँकेचे नूतन चेअरमन अनिकेत पाटील , संमेलन कार्याध्यक्ष व परिवर्तन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किसनराव वराडे , माजी
संमेलनाध्यक्ष डॉ.राम नेमाडे , सामाजिक कार्यकर्ते हेमंत नेहते , डोंबिवली , लेखिका व लेवा गणबोली कोशकार उर्मिला पाटील ,डॉ.विवेक चौधरी, संयोजक तुषार वाघुळदे , अहिराणी भाषा कोशकार डॉ.रमेश सूर्यवंशी , अभिनेत्री सुवर्णलता पाटील ,किशोरी वाघुळदे , लिलाधर कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. उदघाटनपर भाषणात आमदार राजुमामा भोळे म्हणाले , लेवा गणबोली ही समृध्द करायची असेल तर स्वतःपासून सुरुवात करा ,भाषेची लाज न बाळगू देता ही बोली बोलण्याचा प्रयत्न करा , जरी आपण उच्चशिक्षित असलोआणि आधुनिक काळात वावरत असलो तरी ही आपली मायबोली आहे ,तिचा अभिमान बाळगलाच पाहिजे ,या बोलीच्या संवर्धनासाठी डॉ.नारखेडे आणि तुषार वाघुळदे हे निस्वार्थ भावनेने प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी खास गौरव केला.
संमेलनाध्यक्ष आणि इतिहासकार , संशोधक डॉ.नि. रा.पाटील आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढे म्हणाले, प्रत्येक भाषेला बोलीचा गोतावळा असतो , विविध प्रादेशिक बोली म्हणजे मराठीच्या लेकी- सुनाच आहेत..लेवा गनबोलीचा इतिहास हा लेवा पाटीदारांच्या स्थलांतराच्या इतिहासाशी निगडित आहे.त्यांनी आणलेल्या घाटोळी- वऱ्हाडीवर तत्कालीन प्राकृत मराठी व अहिराणीचे संस्कार घडून आजची लेवा गनबोली तयार झाली आहे. या बोलीभाषेच्या मिलनसार प्रभावामुळे हीच भाषा पूर्व भागाची समूह बोलीभाषा झाली आहे.. ही बोलीभाषा एव्हढी लवचिक आणि सर्वसमावेशक आहे की , इतर भाषांमधील शब्द हिच्यात शिरून चटकन लेवाळले आहेत.आणि ही भाषा समृद्ध झाली आहे असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
माजी संमेलनाध्यक्ष राम नेमाडे यांनी गुणी व्यक्तिमत्त्व यांचे कौतुक व्हायला हवे ,आणि प्रोत्साहन मिळायला हवे तसेच समाजातील राजकारण्यांचे दुर्लक्ष होतेय आणि एकजुटीसाठी एकत्र येत नसल्याबद्दल काहीशी खंत व्यक्त केली.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात लेवा गणबोलीत कथाकथन झाले. आपल्या ठसकेबाज आवाजात डॉ.अरविंद नारखेडे यांनी प्रास्ताविक केले.वापी , गुजरात येथील शुभांगी सरोदे यांनी ' मी बहिणाबाई बोलतेय ' ही नाट्यछटा अतिशय सुंदर अभिनय करीत सादर केली..प्रा.डॉ.कमल पाटील , पुणे यांनी माही बहिणाई ही नाट्यछटा सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. डोंबिवली येथील रवी पाटील , प्रतिभाग्रज यांनी सुद्धा लेवा गणबोलीत नाट्यछटा सादर केली , प्रेक्षकांना लोटपोट हसविले.
या सत्राचे अध्यक्ष प्रा.अ.फ.भालेराव होते.त्यांनी लेवा भाषेचा गोडवा आणि लहेजा स्पष्ट केला...
दुपारी 1 ते 2 या वेळेत
प्राचार्य डॉ.प्र.श्रा. चौधरी
' कवी कट्टा ' मध्ये लेवा गणबोली कविसंमेलन उल्हासनगर येथील प्रसिद्ध कवी प्रल्हाद कोलते यांच्या अध्यक्षतेखाली झाले.यात डॉ.मिलिंद धांडे , भुसावळ ,प्रा.संध्या महाजन ,पराग पाटील (बांद्रा) गणेश जावळे बामणोद , प्रा.अ.सु. पाटील,दामोदर चौधरी अट्रावल ,सचिन मौर्य जळगाव , सुवर्णलता पाटील ,डोंबिवली , प्रल्हाद कोलते उल्हासनगर ,अतुल पाटील (सुसरी) कविता लोखंडे (पुणे) डॉ.विजय पाटील जळगांव अंजली बोरोले ,मुलुंड ,यज्ञा विनय पाटील जळगांव ,संध्या भोळे , भुसावळ कुंदा झोपे ,उल्हासनगर ,शीतल पाटील जळगाव ,ज्योती राणे , जळगाव , मनीषा चौधरी , जळगाव , कमल पाटील , संजय पाटील , जळगाव यांनी सहभाग घेतला. बहुतांश कवींनी रसिक- श्रोत्यांची मने जिंकली.
या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती कमल पाटील यांनी केले.
आभार तुषार वाघुळदे यांनी मानले.
चवथ्या सत्रात
दुपारी 2 ते 5 या वेळेत
मराठी कविसंमेलन डॉ.मिलिंद धांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.यात
अरुण वांद्रे , किसनराव वराडे ,जळगाव ,
प्रकाश पाटील ,जळगाव, पुष्पा साळवे ,जळगाव , अशोक पारधे जळगाव ,ललिता टोके , भुसावळ , पंकज पगारे , सोयगाव (औरंगाबाद ) ,विजय सूर्यवंशी जामनेर , गोविंद पाटील , तुषार वाघुळदे जळगाव , ज्योतिनाथ चिखले जामनेर ,कुशल दुसाने असोदा ,संध्या भोळे ,भुसावळ , प
प्रवीण कहाणे चहार्डी , बापूराव वाकलकर , ज्योती राणे , सुहास पाटील , निखिल चौधरी ,अनघा शिंदे ,रेणुका अत्तरदे ,हेमलता पाटील , ( बाम णोदकर ) आदींनी सहभाग घेऊन टाळ्यांची दाद मिळवली.
याचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री
ज्योती राणे आणि तुषार वाघुळदे यांनी केले. संमेलनाच्या प्रारंभी दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी इशस्तवन व स्वागतगीत अंजली बोरोले यांनी तर पसायदान साधना लोखंडे यांनी म्हटले. संमेलन स्थळी विविध पुस्तकांचे प्रदर्शन , विक्रीचे दुकाने आणि कलावंत कुमुदिनी नारखेडे यांनी बहिनाबाईंची प्रतिमा साकारली होती.आकर्षक रांगोळ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
या संमेलनात भालचंद्र पाटील , कोशकार उर्मिला पाटील , कोशकार डॉ.रमेश सूर्यवंशी , डॉ.विवेक चौधरी , डॉ.नंदू चौधरी , विनोद झोपे , श्रावणी सरोदे , लीलाधर कोल्हे , प्रकाश चौधरी , राहुल सरोदे , मोहन पाटील , प्रकाश पाटील ,कुमुदिनी नारखेडे , निशिकांत बामनोदकर ,सुवर्णलता पाटील आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.
संमेलन ठराव
या लेवा गण बोली साहित्य संमेलनात कवयित्री बहिणाबाई यांच्या ' बहिणाईंची गाणी ' मुळे लेवा गणबोलीला वैश्विक ओळख मिळाली म्हणून 3 डिसेंबर , बहिणाबाई पुण्यतिथी " विश्व लेवा गणबोली दिन " म्हणून साजरा करण्यात यावा , भाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी जी व्याकरणवादी मानके असतात त्याची परिपूर्ती डॉ.नि.रा.पाटील लिखित लेवा गणबोली कोष २२ एप्रिल २००५ रोजी प्रसिद्ध झाला, म्हणून २२ एप्रिल हा लेवा गणबोली दिन म्हणून साजरा करण्यात यावा ,आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अभ्यासनाअंतर्गत ,लेवा गणबोली संशोधन आणि समृद्धीसाठी प्रयत्न केले जावेत ,आणि अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा ,यासाठी स्वतंत्र अध्यासनाची निर्मिती व्हावी अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात यावी असे तीन ठराव संमेलनात सर्वानुमते मंजूर करण्यात आले.. यास किशोरी वाघुळदे , डॉ.राम नेमाडे आणि किसनराव वराडे यांनी अनुमोदन दिले.
विशेष म्हणजे पुढील संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ.अरविंद नारखेडे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.या साहित्य संमेलनात उपस्थित साहित्यिक , साहित्य प्रेमींनीही यास पूर्णतः होकार दिला आणि टाळ्यांचा गजर करीत आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाला साहित्य आणि कलाप्रेमी यांची उपस्थिती होती..
0 टिप्पण्या