डोंबिवली पश्चिमेकडील विभागात शिवसैनिक संदेश पाटील हिरा उदयास येत आहे - आम .राजन साळवी
आणि शिवरायांचे विचार आत्मसात करूया
डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 52 देवीचा पाडा गोपीनाथ चौक येथे शिवसेना उपशहर संघटक हरिशचंद्र पाटील व संदेश पाटील रसिका संदेश पाटील आणि सहकारी यांनी शिवरायांचे आणि शिवसेनेचे विचार ऐकविण्यासाठी खास नागरिकांसाठी ऐतिहासिक अभ्यासक लेखक व प्रेरणादायी वक्ते शिवसेना उपनेते सन्मानीय शिव व्याख्याते श्री नितीन बानुगडे यांचे विचार ऐकण्याकरिता आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डान्स कार्यक्रम, मॅजिक शो आयोजित करण्यात आले. त्यावेळी सर्व नागरिकांचे मनोरंजन ही करण्यात आले . ज्वलंत विचारांची आपली शिवसेना शिवव्याख्याते शिवसेना उपनेते उपाध्यक्ष महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ लेखक नितिन बानुगडे पाटील यांचे ज्वलंत विचार सर्व नागरिकांसमोर मांडण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे तसेच राजापूर.लांजा चे आमदार राजनजी प्रभाकर साळवी यांचे डोंबिवली नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेना उपशहर संघटक हरिचंद्र सत्यवान पाटील शिवसेनिक पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
तसेच स्थायी समितीचे माजी सदस्य तथा युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे .उपशहर प्रमुख किशोर मानकामे, संतोष चव्हाण, केलास सणस, आदी पदाधिकारी उपस्थित होते, विशेष आकर्षण म्हणजे चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमातील सुप्रसिद्ध अभिनेता भूषण कडू ही उपस्थित होते, त्यानिही आपली कला सादर करून लोकांचे मनोरंजन केले.
शिवसेना उपशहर संघटक हरिशचंद्र पाटील व संदेश पाटील आणि सहकारी यांनी राबविण्यात आलेलया कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार राजनजी साळवी यांनी संदेश पाटील यांचे काम पाहून कौतुक केले. मुळात शिवसेना हि ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी शिवसेनाप्रमुखाची शिकवण आहे. त्याच धर्तीवर आधारित संदेश पाटील यांची कामगिरी चालू आहे. संदेश पाटील हा शिवसेनिक असून सध्या त्या विभागात उदयास येत आहे, एक हिरा आहे, जनतेच्या समस्याकडे लक्ष देऊन कामे नक्कीच मार्गी लागतील.असे गौरवद्गार आमदार राजन साळवी यांनी कार्यक्रमात काढले.
शिव व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे यांनीही संदेश पाटील यांचे व सहकाऱ्यांचे आयोजित केलेल्या कार्यक्र्माचे अभिनंदन करून त्यांनी आपली मुलुख मैदानी तोफ चालू केली आणि लोकांची मने जिंकून घेतली.

0 टिप्पण्या