महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र आले तर न् तरच देवळाली मध्ये सत्तापरिवर्तन शक्य - दत्ता कडू पाटील

 महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र आले तर न् तरच देवळाली मध्ये सत्तापरिवर्तन शक्य - दत्ता कडू पाटील 



देवळाली प्रवरा - दि. २८ नोव्हेंबर 

महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र आले तर न् तरच देवळाली मध्ये सत्तापरिवर्तन शक्य असल्याचे माजी सनदी अधिकारी तथा देवळाली हेल्प टीम चे अध्यक्ष दत्ता कडू पाटील यांनी त्यांच्या फेसबुक गावगाडा द्वारा मत व्यक्त केले आहे. 

          गावगडा मध्ये कडू पाटील म्हणतात की, आज रवीवार गांवगाडा काहीसा थंड असलातरी गावांत निवडणुकांचे पडघम सत्तारुढ गटाकडून वाजु लागले आहेत. २६ डिसेंबरला नगरपरिषदेची मुदत संपत असुन कदाचित त्या अगोदर वा त्यानंतर निवडणुकीची घोषणा होवुन आचारसंहिता लागेल.हे लक्षात घेवुन सत्तारुढ असतानाच  काही कार्यक्रम सुरु झाले आहेत. यात प्लॅस्टीक बॅाल क्रिकेट सामने न् किर्तन महोत्सव.चला या निमित्ताने गावांत क्रीडा व सांस्कृतीक वातावरण निर्माण तर झाले.या आयोजनामागे हेतु काहिहि असला तरी तरुणवर्ग न् वारकरी भावीक भक्तांना याचा अलभ्य लाभ होईल, त्यानंतर वर्षाअखेरिस दरवर्षीचे साईपारायण सोहळा येईल.म्हणजे महिनाभर थंडी पडली नाहीतर बाजारतळ हाऊसफुल्ल राहिल.

        हेल्फ टीमचे विधायक काम सुरु आहे.गेल्या आठवड्यात टीमच्या बैठकीत आगामी निवडणुकीत काय परिस्थिती राहिल यावर चर्चा झाली.भाजपांमध्ये निर्णय घेणारे एकहाती नेतृत्व आहे.गावातील बहुतेक सत्ता केंद्र त्यांचे ताब्यात आहे.आपल्या कार्यकर्तावर मजबुत पकड आहे. राज्यात सत्ता भाजपाची असो वा राष्ट्रवादी त्यांचा दुहेरी फायदा असतो.गावांतील काही निवडक विरोधक सोडले तर बरेचजण कधी ना कधी त्यांचे मांडवाखाली जावुन आलेले आहेत.तसेच निवडणुक जिंकण्यासाठी लागणारे संघटन व साधनसामग्री लक्षात घेता.गेल्यावेळी ६० टक्के मतदान त्यांना झाले यंदा ९० टक्के होईल असा त्यांचे नेतृत्वाने विश्वास जाहिरपणे बोलुन दाखवला.विरोधकांना भुछत्राची उपमा देत त्यांची पत काय असा सवाल करत कुणी किती कोल्हेकुई करो विजय आपलाच आहे.अशी आत्मविश्वासाची गर्जना केली आहे. 

       विरोधकांचे बाबतीत बोलायचे झाले तर सगळी सामसुम आहे. सगळ्यांनी एकत्र येत महाविकास आघाडी करुन निवडणुक लढवावी. असा एकंदरित सुरु गावांत दिसतो आहे.कोण कुणाला आतुन भिडला आहे. याचा काही नेम नसल्याने मतदारराजा शांत आहे. महाविकास आघाडीची सुत्रे गावांबाहेरील नेतृत्वाकडे असल्याने ते काय निर्णय घेतात.त्यांचे स्थानिक सत्तारुढ नेतृत्वाशी साटेलोटे जगजाहिर आहे. ते ऐनवेळेस काय खेळी करतील किंवा नेहमीप्रमाणे काय डाव टाकतील याचा नेम नसल्याने स्थानिक आघाडी नेतृत्व काहीसे संभ्रमात आहे.त्यात सत्तारुढ गटाने पाच वर्षात विरोधी पक्षातील माश्यांना चांगले खाद्य पुरवून गळाला लावले असल्याची चर्चा आहे.  

         आम्ही मध्यतंरीच्या काळात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला.त्यातुन चांगला समन्वयहि झाला असुन पक्षीय बंधनाने काही कार्यकर्ते बांधले गेले आहेत. वरिष्ठ नेत्यांची धरसोड व नेहमी खेळले जाणारे सोईचे व सोयरेधायरे राजकारण यामुळे ते काहीशी सावध भुमीका घेत आहेत. शहरांतील विरोधकांनी केवळ गावाचे विकासासाठी व काही मुलभुत विचाराचे राजकारणांसाठी पक्षीय बंधने झुगारुन देत शहरविकास आघाडी निर्माण करावी असाहि मतप्रवाह गावांत सुरु आहे. आमची नेहमी आजपर्यंत विरोधी भुमीका राहिली असुन ते कायम रहाणार असल्याने जर हे महाविकास आघाडीचे जुगाड जमले नाही वा त्यात नुरा कुस्ती आढळली तर आपण हेल्प टीम निवडणुकीत उतरवणार अशी घोषणा केली.त्याप्रमाणे विधायक काम करत विरोधहि तीव्र केला आहे.आता आमच्यावर टिका होवु लागली म्हणजे आम्ही विरोधी पक्षाच्या यादीत सामील झालो आहेत.  

        आता दिवस थोडे उरले आहेत.सर्वांची बोलुन झाले आहे.पण विरोधी गाडी काही पुढे सरकत नाही,त्यासाठी आपल्या हेल्पटीमला निवडणुक रिंगणात उतरवण्याचे असेल तर शितावरून भाताची परिक्षा करता येते त्यासाठी भगोल्यात हात घालायची गरज नसते. त्यासाठी शहरवासीयांचा कल घेण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण म्हणुन गुगलवर आपली पसंती विचारली. त्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे.ते म्हणतात तसे ९० टक्के नाही पण ३६ ते ३७ टक्के आहे. अन् आम्हांला १५ ते १६ टक्के मते देवुन दुसरा क्रमांक दिला हा आम्हांला सुखद धक्का. पण एक महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र आले तर न् तरच सत्तापरिवर्तन शक्य आहे अन्यथा नाही हे कटु पण वास्तव आहे. आम्ही हेल्फटीमचा विस्तार करत आहोत, संपर्क दौरा सुरु करत आहोत. त्यातुन १५ ते १६ टक्के शहरवासींयांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न राहिल.  यश अपयश ना साधनसामुग्रीचा फारसा विचार हेल्फ टीम करणार नाही. आपली भुमीका जनतेसमोर परखड मांडेल.पहा तुमचे काय मत आहे. शुभसंध्या #गांवगाडा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या