कामगार जखमी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सुविधा नसल्याने उपचारासाठी कामगाराची होरपळ
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील पाथर्डी येथे स्मशानभूमीत शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शवदहिणीत शव पेटवत असताना गॅस दाहीनीचा स्फोट झाल्याची घटना घडली.गोपाल आडसूळ असे स्फोटात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.यात आडसूळ याचा चेहरा भाजला आहे. मात्र ह्या कर्मचाऱ्याची खरी होरपळ हे रुग्णालयात झाली . या रुग्णालयात अडसूळ यांना उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. दुसऱ्या रुग्णाला देण्यासाठी साधे रुग्णवाहिका देखील रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा आरोप वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे या घटनेतुन समोर आले आहे. दरम्यान या कर्मचाऱ्याला खाजगी रुग्णवाहिकेतून कळवा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे

0 टिप्पण्या