एसएनडीटीचे शिक्षकेतर कर्मचारीआज एक दिवसीय लाक्षणिक संपावर
मुंबई - महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार एसएनडीटी महिला विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली याठिकाणचे शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या काही न्याय्य आणि रास्त मागण्यासाठी उद्या सोमवार २२ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक संपावर जाणार आहेत अशी माहिती संघाच्या प्रभाकर पिळणकर,के.आर.सावंत आणि यशवंत गावडे या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.त्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत पण त्यांना अश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही.सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे, तीन लाभांची आश्वसित प्रगती योजना लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा या व इतर मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

0 टिप्पण्या