कल्याण काँग्रेस रॅलीत जिल्हाध्यक्ष विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणार कारवाई

 
घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणार कारवाई




डोंबिवली ( शंकर जाधव )कल्याणात जनजागृती रॅली काढण्यात आली होती .या रॅलीत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील सहभागी झाले होते .शेकडो कॉग्रेस  कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी  कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही जनजागरण रॅली पुढच्या दिशेने गेली असता  नाना पटोले यांची पाठ फिरताच काँग्रेसचे सेवादल  कार्यकर्त्यांनी काँग्रेस  जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले .याबाबत बोलताना नाना पटोले यांनी याप्रकरणी मला माहिती नाही मात्र तपासून कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केलं 




बाईट :- नाना पटोले( काँग्रेस प्रदेश अध्यक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या