चेंबूरच्या घाटले गावातील फुलाच्या वाडीत
गोळीबाराची घटना, सराईत गुन्हेगाराचा मृत्यू
मुंबई - चेंबूरच्या घाटले गावातील कर्नाटक हायस्कुल समोर असलेल्या साईधाम रहिवासी संघाजवळच्या जुन्या फुलाच्या वाडीमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास वाढदिवसाची पार्टी साजरी केली जात असताना गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या गोळीबारात गोवंडीतील लिंबूनिबाग येथील सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून गोवंडी पुढील तपास करत आहे.
या गोळीबारातील मृताचे नाव संताजी गायकवाड(३०) असे असून देवनार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी दिली.याबाबतची माहिती अशी की,काल रात्री
घाटले गाव परिसरातील एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी या फुलाच्या वाडीतील मोकळ्या जागेत आयोजित केली होती.रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरु होती.त्यावेळी या पार्टीत सहभागी झालेल्या संताजीचा भाऊ कुणाचा तरी फोन आला म्हणून बाजूला गेला. त्याचवेळी अचानक ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत संताजीने स्वतःवर गोळी मारून घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून खरी परिस्थिती पुढील तपासातूनच उघडकीस येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.घटनास्थळी पोलिसांना गोळीबारातील रिकामे काडतुस आणि इतर काही पुरावे हाती लागले आहेत.

0 टिप्पण्या