सातवा वेतन आयोगाच्या शासन मंजुरीची कोंडी फोडली, जय महाराष्ट्र
शिक्षक व कर्मचारी सेनेचा प्रयत्न यशस्वी..
मुंबई- दि.२० राज्याचे नगरविकास मंत्री मान. श्री एकनाथजी शिंदे यांच्या दालनात जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना पदाधिकारी मान.श्री. राजन बने, श्री. जितेंद्र जनावळे, श्रीम.कांचन मस्के, श्री. विजय पाटील, श्री. संदीप परब , श्री. सुनील सुर्वे यांच्या समवेत आपल्या सातवा वेतन आयोग व सेवानिवृत्ती वेतन व उपदान या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
सदर सभेस शालेय शिक्षण मंत्री मान.श्रीम वर्षा गायकवाड आणि मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त मान.श्रीम. अश्विनी भिडे , मान. सह आयुक्त (शिक्षण) श्री .अजित कुंभार आदी मान्यवर VC द्वारे या सभेत उपस्थित होते.
या सभेत संघटनेच्या वतीने सातव्या वेतन आयोगाचा मुद्दा प्रकर्षाने व अत्यंत प्रभावीपणे मांडला
मान.श्रीम.अश्विनी भिडे (अतिरिक्त आयुक्त) यांनी असे सांगितले की प्रलंबित निधीची वाट न पाहता शासनाकडून फक्त सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीचे पत्र मिळाल्यास मुंबई महानगरपालिका खाजगी प्राथमिक शाळांना सातवा वेतन आयोग लागू करेल.
मान. श्री .एकनाथजी शिंदे साहेब यांनी शालेय शिक्षण विभागाकडून सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीचे पत्र लवकरच महानगरपालिका शिक्षण विभागाला प्राप्त होईल याबाबत आश्वस्त केले.
सेवानिवृत्ती वेतन व उपदान याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याबाबत मा. एकनाथजी शिंदे यांनी संबंधित वित्त विभाग , नगरविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग तसेच मुंबई महापालिका आयुक्त व जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे पदाधिकारी याची संयुक्त सभा घेण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आता लवकरच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार. संघटनेच्या प्रयत्नामुळे सुमारे ४५०० शिक्षक व कर्मचारी यांना याचा फायदा होईल. असे संघटनेचे सरचिटणीस श्री.संदीप परब यांनी सांगितले.
संघटनेच्या वतीने मा. एकनाथ शिंदे साहेब व उपस्थित सर्व अधिकारी यांना धन्यवाद देण्यात आले.

2 टिप्पण्या
छान, असेच एक एक पाऊल पुढे पडुदे. शुभेच्छा
उत्तर द्याहटवाVery good ,Keep it up ...God bless you all our team of Jay Maharashtra
उत्तर द्याहटवा