शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचाही पाठिंबा
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण –डोंबिवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने उचलेल्या पाउलामुले शहरातील अनेक ठिकाणच्या कचराकुंडी बंद झाल्या.मात्र शहराच्या स्वच्छतेकडे कानाडोळा करणारे अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना दिसतात.तर प्लास्टिक पिशव्याचा वापर करून पिशव्या रस्त्याच्या कडेला टाकल्या जातात. यामुळे शहर अस्वच्छ तर होते व प्राण्यांचे आरोग्य बिघडते. यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजागृतीप्र पथनाट्य केले.यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे व पंढरीनाथ पाटील यांनी पाठिंबा देत उपस्थित राहिले.
डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंग वाडी चौकात काही नागरिक कचरा टाकतात. स्वच्छ डोंबिवली अभियान, ऊर्जा फौंडेशन, लक्ष्मी नारायण ट्रस्ट या सामाजिक संस्थेने एकत्र येऊन पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांतून परिसर स्वच्छ रहावा याकरता पुढाकार घेतला.गावदेवी मंदिर, गांधीनगर चौक व दत्तनगर चौक येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य केले.यावेळी प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे,पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले स्वच्छ डोंबिवली अभियानाचे अनिल मोकल, आजूबाजूच्या परिसरात राहणारे रहिवाशी उपस्थित होते.यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले,डोंबिवली शहराला कोणीही अस्वच्छ शहर म्हणत असेल तर त्यात तथ्य नाही.आमचे शहर अतिशय स्वच्छ,सुंदर व चांगले आहे.राजकीय पक्ष, पालिका प्रशासन आणि सामजिक संस्था हे जण शहर स्वच्छतेसाठी नेहमीच पुढे असतात.परंतु काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. अश्या नागरिकांनी आपल्या शहराचा विचार केला पाहिजे. अश्या नागरिकांना विनंती करतो कि, रस्त्यावर कचरा टाकू नका, ओला-सुका कचरा वेगळा करून पालिकेच्या घंटागाडीत टाका आणि विशेष म्हणजे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका.

1 टिप्पण्या
Not any credit given of our volunteers as well as not mentioned NGO name.
उत्तर द्याहटवाPlease try to product the same.
Name: innovation for study Foundation along with Manjunata college IQAC and Alumni association
NGO Founder and president : Mr. Pawan Shrivastav
Regards,
Pawan Shrivastav
Founder and president
ISF NGO