धावत्या एक्सप्रेसमध्ये फेरीवाल्यांमध्ये हाणामारी



एक जखमी, दोन अटकेत



कल्याण ( शंकर जाधव )शुक्रवारी संध्याकाळी पनवेल गोरखपूर एक्सप्रेस कल्याण स्टेशनला पोहचली. गाडी टिटवाळया दिशेने जात असताना तीन फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गुटखा विकण्यावरुन हा वाद झाल्याने पवनकुमार गुप्ता नावाच्या फेरीवाल्यावर गुटखा विकणाऱ्या अंकुश सरोज आणि मोहंमद बिलाल शेख या दोघांनी धारदार ब्लेडने वार केले. यात पवन हा गंभीर जखमी झाला आहे. प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ट्रेनमधील टीसीने याची महिती रेल्वे कंट्रोलला दिली. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शारदूल हे आपल्या पथका सोबत कसाऱ्याला पोहचले. जखमी आणि आरोपींना कसारा स्थानकात रेल्वे पोलिसांनी पकडून ठेवले होते. जखमीला नाशिक सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोन्ही आरोपीना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. या प्रकरणात जखमी पवन कुमार यांनी तिसरा एका व्यक्तीचे नाव घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे करीत आहेत.  मात्र ट्रेनमध्ये फेरीवाल्याकडुन ट सर्रासपणे गुटखा विक्री केली जात असून फेरीवाले धारदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याने प्रवाशांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे.


बाईट -वाल्मीक शार्दुल (वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण जीआरपी )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या