मुंबई - मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक २१० मधील स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या नगरसेविक निधीतून व मा.नगरसेवक,कामगार नेते मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने माझगाव येथील लव्हलेन बीआयटी चाळीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम, तसेच युवक उत्कर्ष मंडळाच्या कार्यालयाचे संपूर्ण नुतनीकरण, लव्हलेन बीआयटी चाळ क्रमांक १ च्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण व आसन व्यवस्था, लव्हलेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या श्री गणपती ट्रॉलीच्या शेडचे नुतनीकरण, गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लव्हलेन सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्या जनता केंद्र संपूर्ण नूतनीकरण, लव्हलेन सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्या व्यासपीठ (स्टेज) शेडसहीत संपूर्ण नुतनीकरण या सर्व विकासकामांचा लोकार्पण नुकताच पार पडला.
हा सोहळा खासदार अरविंद सावंत,भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर व आमदार यामिनी जाधव, विभागप्रमुख आणि बेस्टचे चेअरमन आशिष चेंबुरकर प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील,समन्वयक बबन गावकर,उपविभाग प्रमुख विजय कामतेकर, उपविभाग प्रमुख राम सावंत,सरचिटणीस महानगर टेलिफोन निगम कामगार सेना दिलीप जाधव,युवा अधिकारी स्वप्निल बागवे, युवती अधिकारी श्रद्धा वाघमारे,शाखा प्रमुख हेमंत मयेकर,शाखा संघटक मेघा भोईर,युवासेना समन्वयक योगेश झावरे,उप युवा अधिकारी अमित परब,युवा अधिकारी सागर जाधव, माजी शाखा प्रमुख रमेश चेंदवणकर,कृष्णा रेनोसे, माजी शाखा संघटक स्नेहा आवळेगावकर,सर्व उपशाखा संघटक, स्थानिक कार्यकर्ते व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या