डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन स्थगित



डोंबिवली ( शंकर जाधव )घरगुती स्वयंपाकाचा गँस, पेट्रोल - डिझेलची दरवाढ करुन सामन्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणा-या केंद सरकारचा निषेध करण्यासाठी डोंबिवली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले. असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी यांनी दिली.कोव्हिड चे संकट टळलेले नसल्याने उच्च न्यायालयाने राजकीय मोर्चे काढू नयेत असे आदेश दिले आहेत.शहरातील लेव्हल ३ निर्बधाचा विचार करता पोलीस विभागाने देखील मोर्चा स्थगित व्हावा अशी विनंती केली होती. त्यानुसार नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे सुरेश जोशी यांनी सांगितले. शनिवारी सकाळ पासून डोंबिवली पश्चिमेला द्वारका हाँटेल जवळ चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.करोनाने सरकार हवालदिल केले, पण सामान्य लोकांच्या नोक-या गेल्या आणि हाती काम नसल्यामुळे पैसे नाहीत. अश्या वेळी केंद्र सरकारने विकासाऐवजी महागाई कमी करण्यासाठी पैसा वापरावा असे राष्ट्रवादी च्या वतीने सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या