भाजपतर्फे होणारे आंदोलन स्थगित

 भाजप आमदारांनी घन कचरा उपायुक्तांच्या  दांभिकतेचा बुरखा फाडला - भाजपतर्फे होणारे आंदोलन स्थगित



डोंबिवली ( शंकर जाधव )  भाजपचे आमदार  रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत   महापालिका घनकचरा व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला.  इतकेच नव्हे तर घनकचरा अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले आहे तेथे उपाय करण्यापेक्षा त्यांनी उपद्व्यापच अधिक केल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा आणि होणाऱ्या कौतुकाच्या दांभिकतेचा बुरखा फाडला.   कल्याण शहरात उद्या घनकचरा कर व्यवस्थापना संदर्भात भाजप कडून होणारे आंदोलन कोविड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.  मालमत्ता कर आणि घनकचरा उपविधी कर वेगळा करावा यासाठी सातत्याने मागणी करत असल्याचे  देखील त्यांनी यावेळी  सांगितले. 

    कल्याण महापालिकेत भाजप तर्फे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र उच्च न्यायालयातर्फे देण्यात आलेल्या आदेशानुसार कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे असे सांगतानाच यावेळी अनेक गोष्टींचा उलगडा करत त्यांनी उपायुक्तांनी जिथे काम केले आहे तिथे हजेरी बुकमध्ये घोळ केल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांसमोर केला.    

नागरिकांना घनकचरा कराचे ओझे होत असल्याचे सांगत त्यांनी जवळपास ५० हजार नागरिकांकडून  सर्व्हे फॉर्म देखील भरून घेतले. यामध्ये पलावा मधील ३ हजार  नागरिकांनी  हा फॉर्म भरल्याचे सांगितले. मनसे चे आमदार राजू पाटील अधिकाऱ्याचे कौतुक करतात असे सांगितल्यानंतर त्यांनाही तेवढाच कर भराव लागत असून त्यांच्याकडे गडगंज पैसे असतील असे उपरोधिक टोला आमदार राजू पाटील यांना हाणला. यावेळी मोर्चा जरी रद्द झाला असला तरी नागरिकांनी भरलेले फॉर्म पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करणार असून त्यांनी यासंदर्भात विचार विनिमय बैठक लवकरच लावणार असल्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या