भाजपचे माजी मंत्री चंद्रकात पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशी करावी मागणी केली आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे यांनी `अजित पवार काय चीज आहे भाजपला माहित आहे`असा उपरोधिक टोला लगावला.डोंबिवलीत पश्चिमेकडील राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्रातील पहिले जिल्हास्तरीय सोशल मिडियाचे कार्यालयाचे कार्यालय असल्याचे बोलले जात आहे..पक्षविचारधारा,पवारांचे विचार, राष्ट्रवादीच लोकउपयोगी कामे सामान्य जनतेपर्यत पोहोचवली जाणार आहेत.
डोंबिवली पश्चिमेकडील नवरे कंपाऊंड येथील एव्हरेस्ट सोसायटीमधील राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया जिल्हा कार्यालयाचे कल्याण जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सोशल मिडिया जिल्हा अध्यक्ष निरंजन भोसले कल्याण – डोंबिवली शहर जिल्हा सरचिटणीस ९ विशेष जबाबदारी –सोशल मिडिया ) समीर गुधाटे, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी,कार्याध्यक्ष नंदू मालवणकर ( धुळे ),कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अर्जुन नायर,कल्याण पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष शरद गवळी,महिला जिल्हा अध्यक्ष सारिका गायकवाड,मीनाक्षी आहेर,सुनीता देशमुख,विनया पाटील,उज्वला भोसले,सुरय्या पटेल,संगीता मोरे व अन्य प्रदेश,जिल्हा व विधानसभा पदाधिकारी ,सुभाष गायकवाड, प्रकाश तरे,पांडुरंग चव्हाण,श्यम आवारे,एड.ब्रह्मा माळी,प्रशांत माळी, योगेश माळी, भालचंद्र पाटील, समीर भोईर,जगदीश ठाकूर,राजेंद्र नांदोस्कर, राहुल चौधरी, समीर वानखडे, मधु करशेळके, प्रशांत शिंदे यांसह अन्य प्रदेश,जिल्हा व विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशी करावी असे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे, याबाबत पत्रकारांनी विचारले असता जिल्हाअध्यक्ष शिंदे असता म्हणाले,अजित पवार यांना घेऊन भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.पुढे काय झाले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे `अजित पवार काय चीज आहे हे भाजपाला माहित आहे`असा उपरोधिक टोला लागवाला. तर भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल विधान केल्याबाबत विचारले असता जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी `पवार यांचे नाव घेतल्यावर माणूस मोठा होतो`अश्या शब्दात पडळकर यांची खिल्ली उडवली.


0 टिप्पण्या