गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण ची उत्तम कामगिरी;
डोंबिवली विभागातील मोबाईल चोरी करणारे
आरोपी पकडले..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
टिळक नगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १०२/२१ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे दिनांक ३०/०६/२१ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नामे १) अक्षय कचरू अहिरे, वय - २३ वर्षे २) प्रथमेश जनार्दन गायकवाड, वय - १९ वर्षे ३) गणेश अशोक आहिरे , वय - २० वर्षे सर्व राहणार - शेलार नाका, पाथलीं, डोंबिवली पूर्व, यांना ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्याचा अनुषंगाने तपास करता प्रस्तुत गुन्ह्यातील चोरीस गेलेला विवो कंपनीचा रुपये १७०००/- किमतीचा मोबाईल आरोपी क्रमांक १) याचेकडून हस्तगत करण्यात आला असून अजून ६ मोबाईल डोंबिवली भागातून चोरी केल्याचे कबूल केले आहे, तसेच सदर तीनही आरोपिंकडून अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपित अक्षय अहिरे हा डोंबिवली पोलिस स्टेशन तसेच टिळक नगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सदर तिन्ही आरोपी यांना मोबाईल चोरीच्या मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी टिळक नगर पोलीस स्टेशन च्या ताब्यात रिपोर्ट द्वारे देण्यात आले आहेत.
सदरच्या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सपोनि भूषण दायमा, पोउपनिरी नितीन मुदगुन, पोउपनिरी मोहन कळमकर,पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे,अजित राजपूत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, सचिन वानखडे आणि हरिचंद्र बंगारा असे अधिकारी आणि अंमलदार सदर कारवाई मध्ये होते.


0 टिप्पण्या