शिवसैनिकाची पालिका आयुक्तांकडे तक्रार...
डोंबिवली - ( शंकर जाधव )
कल्याण- डोंबिवलीत शहरात कचरा प्रश्न गंभीर बनत असून रस्त्यावर साचलेला कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदानजवळ, श्रुतीधारा, श्रीप्रसाद,शिव आशिष दर्शन सोसायटी मधील गल्लीत साचलेला कचरा गेले दोन महिने घनकचरा व्यवस्थापना विभागाच्या कामगारांनी उचलला नाहीपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसले शिवसेना शाखा प्रमुख अजय घरत यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगुलकर यांना घरत हे अनेक दिवसांपासून यासंदर्भात कळवूनही सदर ठिकाणचा कचरा उचलला गेला नाही. दरम्यान डोंबिवलीत रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचलेला असल्याने यावर पालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही तर नागरीक संतप्त होईल असे घरत यांनी सागितले.


0 टिप्पण्या