रेल्वे डब्यात दोन अल्पवयीन मुलांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला
ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यानची घटना
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात रेल्वे डब्यात गर्दी नसल्याचा फायदा घेत दोन दोन अल्पवयीन मुलांनी चाकूचा धाक दाखवून एका प्रवाश्याकडून मोबाईल हिसकावून पल काढला. हि घटना रविवारी ६ तारखेला दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान चालू रेल्वे गाडीत घडली. डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला असून या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील मुरलीधर रामकिशन यादव ( २४ ) हे ६ तारखेला दुपारी चार वाजून २० मिनिटांनी कल्याण रेल्वे स्टेशन येथून ठाणे धीम्या गतीच्या लोकलमध्ये प्रवास करत होते.या डब्यात अधिपासुंचा दोन अल्पवयीन मुले बसली होती. लोकल ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान आली असता या दोन अल्पवयीन मुलांनी मुरलीधर यादव यांना चाकूचाधाक दाखविला.या मुलांनी यादव यांच्याकडील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकल आल्यावर लोकलमधून उतरून पळ काढला.यादव यांनी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
0 टिप्पण्या