************************************************************************
सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालेल्या वयोवृद्ध महिलेस मारहाणीबाबत हिललाईन पोलीस ठाणे येथे मारहाण करणारे श्री गजानन चिकनकर यांच्याविरोधात गुरनं १४०/२०२१ भादवि कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल.
************************************************************************
कल्याण : वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. याच मागणीमुळे पोलिसांवरील सामाजिक दबाव वाढला होता. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना केला. त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत
घरात पाण्याच्या वादावरुन एका 85 वर्षीय वृद्धाने 80 वर्षीय त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. महिलेला मारहाण करणारा इसमाचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. संबंधित घटना ही 31 मे रोजी घडली आहे. गजानन बुवाच्या 13 वर्षीय नातवाने संबंधित प्रकाराचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नराधम वृद्ध पतीवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांवर अखेर सामाजिक दबाव वाढल्याने त्यांनी सु मोटोने गजानन बुवा चिकणकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे
संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धेला भेटून तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र वृद्धेने पती गजानन बुवा चिकणकर याच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचं सांगितलं. अखेर सामाजिक दबाव पाहता पोलिसांनी सु मोटोने मारहाणीचा गुन्हा दाखल केला. गजानन बुवा चिकणकर आळंदीला गेला होता. त्यामुळे पोलिसांचं एक पथक आळंदीला रवाना झालं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित घटना ही कल्याण पूर्वेतील द्वारली गावात घडली होती. हे गाव अंबरनाथ तालुक्यात येतं. कल्याण पूर्वेच्या मलंगगड रोडलाच प्रसिद्ध अशा चक्की नाकाच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. याच गावात गजानन बुवा चिकणकर आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. या वृद्धाला घरातील इतर सदस्यही दचकतात. विशेष म्हणजे हा वृद्ध स्वत:ला हभप समजतो. पण स्वत:च्या घरात महिलांशी अत्यंत निघृणपणे वागतो. त्याची घरात दहशत असल्याने घरातील इतर महिला देखील त्याला मारहाण करण्यापासून रोखण्यासाठी पुढे आले नाहीत.
0 टिप्पण्या